बापरे बाप! कोरोना चाचणीचा रिपोर्ट यायला लागतायेत 10 ते 12 दिवस! वाचा कुठे घडतंय हे

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 22 May 2020

  • कोरोना चाचणी अहवाल मिळण्यास विलंब 
  • - नवी मुंबईतील आरोग्य कर्मचारी धास्तावले

तुर्भे: नवी मुंबई पालिका हद्दीत दैनंदिन करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणी अहवाल येण्यास जास्त कालावधी लागत आहे. गेल्या दहा दिवसापासून कोरोना चाचणी सॅम्पल रुग्णालयातच पडून असल्याने कोव्हिड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती वाढली आहे.

Coronavirus : फक्त 2 मीटरचं सोशल डिस्टन्सिंग नाही तर वाऱ्याचा वेगही महत्वाचा, अमेरिकन संस्थेचा अहवाल

वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे रूपांतर कोव्हिड 19 रुग्णालयात करण्यात आले. याठिकाणी गंभीर व अति गंभीर प्रकारच्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. तसेच याच ठिकाणी कोरोना चाचणी घेतली जाते. येथून मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात कोरोना सॅम्पल पाठविले जातात. त्यानंतर तिथे अहवाल तयार केले जातात. परंतु कोरोना चाचणीचे अहवाल येण्यास दहा ते बारा दिवसाचा अवधी लागत असल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.

परप्रांतीय कामगार करताय मुंबईला 'जय महाराष्ट्र'; प्रशासनाकडूनही मिळतेय सहकार्य

कोव्हिड रुग्णालय वाशीमध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी 9 मे रोजी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी नियमित 11 दिवस रुग्णालयात काम केले. त्याचा कोरोना चाचणी अहवाल 21 मे रोजी आला. त्यामध्ये त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांनी सलग 11 दिवस काम केल्याने त्याचा अनेकांशी संपर्क आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. याबाबत नवी मुंबई पालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांच्याशी संपर्क साधला असता, तात्काळ आयुक्त, मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देतो, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delay in receiving corona test report in navi mumbai