.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Voter List
ठाणे - मतदार यादीतून नाव गायब झाल्याने अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त करीत, निवडणूक प्रक्रियेच्या कारभारावर टीका केली होती. आता मतदार यादीतून नाव गायब झालेल्या मतदारांना मतदार यादीत पुन्हा स्थान मिळणार आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यामतून राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत फॉर्म ६ भरून त्यासोबत ११ पुराव्यांपैकी १ पुरावा सादर केल्यास मतदाराचे नाव पुन्हा यादीत समाविष्ट होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.