दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत संजय राऊत यांचं 'मोठं' विधान, उपस्थित केली गंभीर शंका

सुमित बागुल
Monday, 25 January 2021

सर्वच राजकीय पक्षांनी आपल्यातील मतभेद विसरून एकत्रित यायला हवं. भाजपातील प्रमुख लोकांनाही हा प्रश्न लवकरच सुटावा असं वाटतंय.

मुंबई : भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल जगभरातून घेतली जातेय. जगभरातील माध्यमांचं आपल्यावर लक्ष आहे. उद्या दिल्लीत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली, ट्रॅक्टर परेड निघणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इतर विविध आंदोलने सुरु आहेत.

मुंबईतदेखील मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकरी एकत्रित आलेले आहेत. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शेतकरी मुंबईत दाखल झालेत. मात्र असं असलं तरीही मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी येत असताना मुंबईतून अजूनही कोरोना गेलेला नाही त्याची काळजी घ्यायला हवी. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने नवीन संकट पुन्हा महाराष्ट्रात पसरेल अशी चिंता मुख्यमंत्र्यांना आहे असं संजय राऊत म्हणालेत . 

महत्त्वाची बातमी : "पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या वतीने केंद्र सरकारच्या तीनही शेतकरी कायद्यांचा विरोध करणार" - अजित नवले

केंद्र आडमुठी भूमिका घेतंय का ? 

हा देशातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, गेले साठ दिवस दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन करतायत. शेतकऱ्यांसोबत बातचीत करण्याचा फर्स्ट राउंड, सेकंड राउंड, थर्ड राउंड असा एक विक्रम सरकार प्रस्थापित करतंय. शेतकऱ्यांची चर्चेची पहिली फेरी झाली तेंव्हाच विषय निकाली लागला असता आणि मोदी सरकारची प्रतिष्ठा वाढली असती. भविष्यात सरकारला तसं करावंच लागणार आहे. साठ दिवस शेतकऱ्यांना तंगवून देशाच्या प्रजासत्ताक दिनी, शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीत सुरु ठेवून तुम्हाला देशातील वातावरण बिघडवायचं आहे का ? असं काही कारस्थान दिसतंय का ? या शंका लोकांना यायला लागल्या आहेत.  

महत्त्वाची बातमी इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची तुलनात्मक कामगिरी पाहून रँकिंग देण्याचे काम केले जाते.
ते आतल्याआत गुदमरलेले आहेत...

शेतकरी शेकडो मैलांची पायपीट करून दिल्ली आणि मुंबईत येत आहेत. अशात सर्वच राजकीय पक्षांनी आपल्यातील मतभेद विसरून एकत्रित यायला हवं. भाजपातील प्रमुख लोकांनाही हा प्रश्न लवकरच सुटावा असं वाटतंय. मात्र ते आतल्याआत गुदमरलेले आहेत, त्यांना स्पष्ट बोलता येत नाही, असंही संजय राऊत म्हणालेत.  

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

Delhi farmers protest mumbai farmers march reaction of sanjay raut on central government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi farmers protest Mumbai farmers march reaction of sanjay raut on central government