मोठी बातमी - JNU हल्ल्यातील दहा हल्लेखोरांची ओळख पटली !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

नव्या वर्षाच्या अगदी सुरवातीलाच JNU म्हणजेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील पेरियार वसतिगृहात काही जणांनी हल्ला केला. याचसोबत काही मुला-मुलींनी साबरमती वसतिगृहात देखील तोडफोड करत हल्ला केला. या हल्लेखोरांमुळे आइशी घोष ही देखील होती. अशातच या हल्ल्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर येतेय. 

हा हल्ला झाल्यानंतर पोलिसांवर देखील निशाणा साधला गेलेला. पोलिसांच्या एकूणच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अशात आता गुन्हे अन्वेषण विभागाचे डीसीपी जॉय टिर्की यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलीये. 

धक्कादायक - शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी घेतलं ताब्यात

या हल्ल्यात ज्यांनी ज्यांनी तोडफोड केलीये अशा तब्बल दहा मुला-मुलींची ओळख पटली आहे. यामध्ये आइशी घोषसह जेएनयूचा माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता आणि प्रिया रंजन यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेत सर्व माहिती माध्यमांसमोर ठेवलीये. याचसोबत १ जानेवारी ते ५ जानेवारी, म्हणजेच हल्ला होण्याच्या दिवसापर्यंत नोंदणी प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. JNU मध्ये नोदणी साठी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचा विरोध असल्याचं पोलिसांनी सांगीतलं.

मोठी बातमी - ...म्हणून परदेशी कांद्याला ग्राहक, व्यापारी म्हणतायेत नको!

विद्यार्थ्यांशी संबंधित विविध संस्थांकडून सर्व्हर बंद ठेवण्याचे वारंवार प्रयन्त करण्यात आले होते. ३ जानेवारी आणि ४ जानेवारीला असे हे प्रयन्त करण्यात आले होते, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. 

दरम्यान आता हल्ल्यात ओळख पटलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकडून या हल्ल्याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलंय. 

delhi police identified ten attackers participated in vandalizing the JNU campus

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi police identified ten attackers participated in vandalizing the JNU campus