शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी घेतलं ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

पोलिसांना दिलेल्या माहितीत, जेंव्हा ही लहान मुलं ओरडायची, रडायची तेंव्हा ही मुलगी पुन्हा त्यांना कपडे घालायची आणि शिकवणी सुरु करायची. 

मुंबईत  एक अत्यंत लाजिरवाणा आणि विकृत प्रकार समोर येताना पाहायला मिळतोय. मुंबईतील एका १९ वर्षीय शिकवणी घेणाऱ्या मुलीने तिच्याकडे येणाऱ्या सहा आणि तीन वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून ते व्हिडीओ आपल्या बॉयफ्रेंडला पाठवलेत. या विकृत मुलीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला मुंबई पोलिसांनी प्रायव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालणे आणि त्याचं मोबाईलवर शूटिंग केल्याप्रकरणी अटक केली आहे.  

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार ती मुलगी हे सर्व व्हिडीओ आपल्या बॉयफ्रेंडला पाठवायची. या मुलीच्या पालकांनी तिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलंय. 

हेही वाचा - २०२० मध्ये 'या' सिनेमांचे येणार सिक्वल 

पीडित मुलीच्या पालकांच्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी लहान बहिणीने शिकवणी नंतर परतल्यावर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केली. तिच्या आईने का दुखतंय, कसं लागलं याची विचारणा केली असता तिने सर्व प्रकार आईला सांगितला. यानंतर आईने तिच्या मोठ्या बहिणीशी याबद्दल विचारपूस केली असता तिने या कृत्याला दुजोरा दिलाय. 

पोलिसांना दिलेल्या माहितीत, जेंव्हा ही लहान मुलं ओरडायची, रडायची तेंव्हा ही मुलगी पुन्हा त्यांना कपडे घालायची आणि शिकवणी सुरु करायची. 

हेही वाचा - कॉर्पोरेट मुंबईतही भरल्या पारंपरिक जत्रा, तुम्ही येताय ना ?

हा सर्व धक्कादायक आणि विकृत प्रकार समोर आल्यानंतर सदर लहान मुलीच्या पालकांनी या शिक्षिका मुलीच्या घरी जात तिला बेदम चोप दिला आणि तिला पोलिसांच्या स्वाधीन केलंय. या १९ वर्षीय शिक्षिका मुलीवर भारतीय दंड संहिते अंतर्गत असलेल्या अनैसर्गिक लैंगिक कृत्य आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिच्या बॉयफ्रेंडला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

19 year old Woman Tutor Inserts Pencil In Private Parts of students Records Video Arrested


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 year old Woman Tutor Inserts Pencil In Private Parts of students Records Video Arrested

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: