Delisle Bridge: डिलाईल पुलाला भारतीयाचे नाव द्या; भाजपच्या बड्या नेत्याची मागणी

Delisle Road Bridge
Delisle Road BridgeEsakal
Updated on

Delisle Bridge: धोकादायक झाल्याने बंद करण्यात आलेला लोअर परळ येथील डिलाईल रोड पूल आजपासून पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर व उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते डिलाईल रोड पुलाचे उद्घाटन झाले.

डिलाईल पुल हे नाव एका विदेशी माणसाचे असल्याने या पुलाला भारतीय माणसाचे नाव द्यावे, तसेच सरकता जिना चालू होईपर्यंत पुलावरून पाई जाण्याची व्यवस्था करावी या दोन सूचना पालकमंत्री लोढा यांनी यावेळी केल्या. लोढा यांच्या सूचनेमुळे डिलाईल रोड पुलाच्या नामकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. तब्बल पाच वर्षांनंतर या पुलावरून पुन्हा एकदा बेस्ट बस धावणार आहे.

Delisle Road Bridge
Delisle Bridge: डिलाईल पूल वाहतुकीसाठी होणार खुला; पालिकेच्या पूल विभागाची परवानगी

पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन दक्षिण मुंबईतील प्रवासासाठी नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे.ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल पुलामध्ये दोन्ही दिशेने प्रत्येकी तीन मार्गिका तर गणपतराव कदम मार्गावर दोन्ही दिशेला प्रत्येकी दोन मार्गिकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. जुन्या पुलाच्या तुलनेत गणपतराव कदम मार्ग आणि ना. म. जोशी मार्गावर अतिरिक्त मार्गिकेचा पर्याय उपलब्ध झाल्याने वाहतूक सुरळीत होईल, असेही पालकमंत्री लोढा म्हणाले.

२०१८ मध्ये धोकादायक झाल्याने बंद करण्यात आलेला डिलाईल रोड पूल उद्या शुक्रवारपासून मुंबईकरांच्या सेवेत आला आहे. त्यामुळे डिलाईल रोड पुलावरुन प्रवाशांच्या सेवेत धावणाऱ्या बसेस पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावणार आहेत. डिलाईल रोड पूल उद्या शुक्रवारपासून वाहतुकीस दोन्ही बाजूने खुला झाल्याने या उड्डाणपुलावरून प्रवर्तित होणारे बस मार्ग क्र.२ मर्य.,४४, ५०,५२, ५७ ,६३ चे प्रवर्तन पूर्ववत करण्यात आल्या आहे.

Delisle Road Bridge
Dhangadi Bridge : अखेर पूल बांधण्यास केंद्राची परवानगी, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान अन् गडकरींचे आभार

एफआयआर मधून सुनील शिंदेंचे नाव काढा - आशीष शेलार

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे डिलाईल रोड पुलाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असल्याने सुनील शिंदे यांचे नाव एफआयआर मधून काढण्यात यावे, असे मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार म्हणाले. दरम्यान, सुनील शिंदे उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिल्याने शेलार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावला का, अशी चर्चा सुरु आहे.

४ नवीन जिने बांधणार

नवीन बांधण्यात आलेल्या पुलामध्ये ४ नवीन जिने बांधण्यात येणार आहेत. तसेच २ सरकते जिने जोडण्यात येणार आहेत. सेवा मार्गांची रूंदी वाढल्यामुळे तसेच पुलाखालील मोकळ्या जागेमुळे पादचाऱ्यांचा ये जा करण्याचा मार्ग सुरळीत होणार आहे.

Delisle Road Bridge
Chandani Chowk Bridge : चांदणी चौक की भूलभुलैया ? सुरक्षित रस्त्याच्या मागणीसाठी मूक मोर्चा; कोथरूड परिसरातील नागरिकांचे आंदोलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com