esakal | विक्रमगडमध्ये बसस्थानकाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये बसस्थानकाची मागणी

विक्रमगड तालुक्‍याच्या ठिकाणी अद्ययावत एस. टी. बसस्थानकच नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हांत, पावसाळयात पावसात तासन्‌ तास ताटकळत येथील प्रवाशांना एस.टी.ची वाट पाहावी लागते.

विक्रमगडमध्ये बसस्थानकाची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विक्रमगड : विक्रमगड तालुक्‍याच्या ठिकाणी अद्ययावत एस. टी. बसस्थानकच नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हांत, पावसाळयात पावसात तासन्‌ तास ताटकळत येथील प्रवाशांना एस.टी.ची वाट पाहावी लागते. विक्रमगड हे तालुक्‍यातील मुख्य शहराचे ठिकाण असतानाही येथे तालुका निर्मितीपासून बसस्थानक नाही. त्यामुळे सद्यस्थितीत गेल्या 20 वर्षांपासून उपलब्ध पिकअप शेडवर काम भागविले जात आहे. 

विक्रमगड तालुक्‍याची लोकसंख्या जवळपास दीड लांखाच्या घरात जाऊन पोहचली आहे; तर विक्रमगड शहराची लोकसंख्या 25 हजारावर गेली आहे. येथे दररोज विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या अंदाजित 60 ते 70 एस.टी. बस ये-जा करतात. विक्रमगड शहर हे तालुक्‍याचे मुख्यालय असल्याने अधिकारी व कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व दररोजच्या कामासाठी प्रवास करणारे एस.टी.चे असंख्य प्रवासी प्रवास करीत असतात. येथे केवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पिकअप शेड आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते. ही पिकअप शेड त्या वेळेस खासदार निधीतून 20 वर्षांपूर्वी बांधलेली आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाने प्रवाशांसाठी केले तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

ही बातमी वाचा ः ठाण्यात कोरोना व्हायरसच्या अफवेच पीक

प्रवाशांची मोठी गैरसोय 
विक्रमगड शहर हे तालुक्‍यातील 94 गावपाड्यांचे मुख्यालय असल्याने दरारोज गाव, खेड्यापाड्यातून तसेच शहरातून विक्रमगमध्ये अगर विक्रमगडहून एस.टी. बसने विविध भागात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, वाडा, भिवंडी, ठाणे, डहाणू आदी ठिकाणी हजारो प्रवासी प्रवास करीत असतात; मात्र शहरात अद्यापही अद्ययावत असे एस.टी. बसस्थानक नाही. वृद्ध, रुग्ण, महिला प्रवाशांसाठी प्रसाधगृह, पिण्याचे पाणी आदी सोय नसल्याने अशा प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे. 

loading image