esakal | ठाण्यात कोरोना व्हायरसच्या अफवांचे पीक 
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात उष्मा वाढला

यंदा अवकाळी पावसानंतर थंडीच्या मोसमातदेखील हिवाळी पाऊस बरसला होता. आता तर, थंडीचा मोसम सुरू असतानाच उष्मा वाढू लागला आहे. या बदलत्या वातावरणामुळे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. ताप सर्दी, पडसे यासह खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याने चीनमधील "कोरोना'ची धास्ती नागरिकांना सतावू लागली आहे. या व्हायरल आजाराशी लढाई सुरू झाल्याने पालिकेच्या रुग्णालयांसह सरकारी दवाखाने रुग्णांनी गजबजू लागले आहेत.  

ठाण्यात कोरोना व्हायरसच्या अफवांचे पीक 

sakal_logo
By
दीपक शेलार

ठाणे : यंदा अवकाळी पावसानंतर थंडीच्या मोसमातदेखील हिवाळी पाऊस बरसला होता. आता तर, थंडीचा मोसम सुरू असतानाच उष्मा वाढू लागला आहे. या बदलत्या वातावरणामुळे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. ताप सर्दी, पडसे यासह खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याने चीनमधील "कोरोना'ची धास्ती नागरिकांना सतावू लागली आहे. या व्हायरल आजाराशी लढाई सुरू झाल्याने पालिकेच्या रुग्णालयांसह सरकारी दवाखाने रुग्णांनी गजबजू लागले आहेत.  

धक्कादायक...कोरोनानंतर टोमॅटो व्हायरसचा जगाला धोका

यंदा पाऊस अनियमित पडल्याने वातावरणातदेखील झपाट्याने बदल होऊ लागले. त्यातच थंडीच्या मोसमात पुन्हा रिमझिम पावसाचे आगमन झाल्याने हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले. जानेवारीत थंडीचा मोसम सुरू झाला असताना आता दिवसा कडक उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. ठाणे शहर खाडी किनारी वसल्याने रात्री वातावरणात गारवा तर, दिवसा तापमानात वाढ असे बदल सातत्याने होत आहेत. सकाळपासूनच तापमान वाढत असल्याने नागरिकांना उन्हापासून बचाव करावा लागत आहे. यामुळे सर्दी-पडसे, कफ, तापासारख्या आजाराने ठाणेकर हैराण झाले आहेत. 

फेब्रुवारी महिन्यात ताप, सर्दी आणि खोकल्याची लागण झालेले रुग्ण प्रामुख्याने रुग्णालयात दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. या तापसरीमुळे नागरिक "कोरोना' या आजाराची लागण झाल्याच्या भीतीने ग्रासले आहेत. "कोरोना'ची लक्षणे देखील याचप्रमाणे असल्याने ही भीती व्यक्त होत असल्याने ठाण्यात अफवांचे पीक आले आहे.

मात्र, सर्दी-पडसे व ताप आल्यास किंवा खोकला झाल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. ही लक्षणे "कोरोना'ची नाहीत, किंबहुना भारतात कोरोनाची लागण झालेली नाही. तेव्हा, कोरोनाची भीती नाहक बाळगू नये, असे स्पष्ट करून या आजारांवर प्रतिबंधक उपायोजना करून औषधे घ्यावीत, सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांनी आपल्या आहारात, पिण्याच्या पाण्यात अपायकारक ठरतील अशा गोष्टी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार याने ठाणेकरांना केले आहे. 

ठाण्यातील 'या' वर्दळीच्या भागात लागतोय वाहनांना ब्रेक

भारतात कोरोनाचा व्हायरसची कोणतीही लक्षणे नाहीत. रुग्णांनी नाहक भीती बाळगू नये. गेल्या दोन दिवसांपासून ऊन जास्त आहे. रात्री थंडी आणि दिवसा उन्हाळा यामुळे व्हायरल आजारांचे प्रमाण वाढले असून सर्दी, पडसे, ताप व खोकल्याचे आजार बळावले आहेत.बदलत्या वातावरणामुळे घशाला कोरड पडणे आदी नियमित बाबी झाल्या आहेत. तरी, रुग्णांनी घाबरून न जाता वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करण्यासह रुग्णांनी दर्जेदार डॉक्टरांकडे जावे. तसेच, गर्दीची ठिकाणे टाळण्यासह नागरिकांनी नियमितपणे हॅन्डवॉशचा वापर करावा.
- डॉ. कैलास पवार,
जिल्हा शल्यचिकित्सक 

 

हवामान तक्ता (अंश सेल्सियसमध्ये) 
                 किमान   कमाल 
15 फेब्रुवारी  23.07   35.04 
16 फेब्रुवारी  22.08   36.05 
17 फेब्रुवारी  23.04   38.07 
18 फेब्रुवारी  25.03   38.01 

loading image
go to top