कोरोनामुळे खोकला, सर्दी, तापाच्या औषधांना मागणी 20 टक्क्यांनी वाढली मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे खोकला, सर्दी, तापाच्या औषधांना मागणी  20 टक्क्यांनी वाढली मागणी

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे सर्दी, खोकल्याचे ही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून सध्या सर्दी, खोकला, घसादुखी आणि तापावरील औषधांची मागणी वाढली आहे. तब्बल 20 टक्क्यांनी या औषधांची आणि गोळ्यांची मागणी वाढल्याचे फार्मासिस्टकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनामुळे खोकला, सर्दी, तापाच्या औषधांना मागणी 20 टक्क्यांनी वाढली मागणी

मुंबई - कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे सर्दी, खोकल्याचे ही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून सध्या सर्दी, खोकला, घसादुखी आणि तापावरील औषधांची मागणी वाढली आहे. तब्बल 20 टक्क्यांनी या औषधांची आणि गोळ्यांची मागणी वाढल्याचे फार्मासिस्टकडून सांगण्यात आले आहे. मात्र, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशनशिवाय कोणत्याही व्यक्तीला औषध न देण्याची भूमिका केमिस्ट, फार्मासिस्टने घेतल्यामुळे या औषधांची योग्य विक्री होत असल्याचे संघटनांनी सांगितले आहे. 

चाकरमाने निघाले कोकणाला मुंबई विभागातून 16 बस रवाना  तीन हजार प्रवाशांनी केले आरक्षण

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामूळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यातच मुंबईत सातत्याने पाऊस पडतोय. यातून सर्दी, खोकला, ताप आणि घसादुखी ही लक्षणं ही मुंबईकरांमध्ये दिसू लागली आहेत. व्हायरल तापाने ही मुंबईकर त्रस्त आहेत. त्यामुळे, ही अशी लक्षणं दिसल्यानंतर लोक लागलीच औषधं खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. 

खरंतर, ताप, सर्दी, खोकला, ताप, घसादुखी आणि अंगदुखी अशी लक्षणे लोकांना वातावरणा बदलामूळे ही जाणवू लागतात. पण, कोरोनाची लक्षणे ही सारखीच असल्याकारणाने लोक घाबरुन डॉक्टरांकडे प्रिस्क्रिपशन लिहुन या आजारांवरील औषधं खरेदी करत आहेत. 

लोक आधीच कोरोनाने घाबरले आहेत. मात्र, सर्दी, खोकला, ताप जरी असला तरी तो कोरोनाच असेलच असे नाही. सध्या पाऊस जास्त पडतो आहे. त्यामुळे, वातावरण बदलामुळे ही असे आजार उद्भवतात. त्यामूळे, किमान 20 टक्के या आजारांवरील औषधांची मागणी वाढली आहे. पॅरासिटोमाॅल किंवा सर्दी, खोकल्यावर दिल्या जाणार्या औषधांची मागणी वाढली आहे. मात्र, कोणत्याही प्रिस्क्रिपशनशिवाय ही औषधं घेतली जाऊ नये. आणि केमिस्ट नेही अशीच औषधं उपलब्ध करुन देऊ नये.

कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top