
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या धर्तीवर कृषी गुन्हे शाखा आणि कृषी न्यायालये निर्माण करण्यात यावीत, अशी मागणी करीत भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिले.