Sharad Pawar : ही निवडणूक ठाणे, कल्याण, भिवंडी पुरती मर्यादित नाही तर, जगात जिथे जिथे.. शरद पवारांचा घणाघात

भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी कल्याण पश्चिम येथे उपस्थित होते.
democracy is heading towards dictatorship says sharad pawar lok sabha political campaign
democracy is heading towards dictatorship says sharad pawar lok sabha political campaignSakal

डोंबिवली - चीन आपल्या देशात अरुणाचल प्रदेशमधून घुसखोरी करतोय त्या कडे देशाचा पंतप्रधान ढुंकून ही पाहत नाही. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या गांधी कुटुंबियाचा सन्मान सोडा मोदी त्यांच्यावर टिका करत फिरतात. लोकशाहीला न मानणाऱ्या मोदींची पावले हुकूमशाहीकडे जाणारी आहेत. आपल्या स्वातंत्रावर कोणी गदा आणत असेल तर आपल्याला जागे व्हावे लागेल असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कल्याण येथे केले.

भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी कल्याण पश्चिम येथे उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील, ज्येष्ठ नेते संजय राऊत, आसिम सरोदे, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, वंडार पाटील, उमेदवार सुरेश म्हात्रे, सचिन पोटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी अध्यक्ष पवार यांनी काँग्रेसच्या गांधी घराण्याचे देशासाठी असलेले योगदान सांगत, आताचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पावले लोकशाही कडून हुकूमशाहीच्या दिशेने चालली असल्याचे सांगितले. पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी ठिकठिकाणी जाऊन राहुल गांधी यांच्यावर टीका करतात. गांधीच्या भारत जोडो यात्रेची टिंगल केली गेली. मात्र ते रॅलीकाढून लोकांना भेटून त्याचे सुख दुःख समजून घेत आहेत.

राहुल गांधी यांच्या कुटुंबाचे देशासाठी काही योगदान नव्हतं का ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले व जगाला भारताची ताकद दाखवून दिली असे सांगितले. गांधी यांनी केलेल्या त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला पाहिजे. मात्र त्यांचा सन्मान सोडा हे टिंगल टवाळी करतात.

आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य किंमती दिल्या. आज मोदी सांगतात मी फुकट धन्य देतो. ते फुकट देत नाही. शेतकरी घाम गळतात म्हणून मोदीची हिम्मत झाली. देश जगातला गहू, भाजीपाला पिकवणारा देश झाला आसता. देशातल्या शेतकऱ्यांच अन्न बाजूला ठेऊन बाहेरून अन्न आणायचं ही स्थिती देशात आहे.

सर्व गोष्टी एक गोष्ट सांगते लोकशाही हुकूमशाही कडे जातं आहे. संजय राऊत यांनी प्रथम मंत्री टीका केली म्हणून त्याला जेलमध्ये टाकल. अनिल देशमुख छोटी केस मोदी समोर आली आणि गृहमंत्री असताना अटक केली. केजरीवाल उत्तम असून त्यांनी केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हटलं तर त्यांना अटक केली गेली.

आजचे हे राज्यकर्ते लोकशाच्या मार्गाने जात नाही. आजची मोदींची पावले ही हुकूमशाहीच्या दिशेने जाणारी आहेत. याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे. लोकशाहीवर कोणी गदा आणत असेल तर आपल्याला उठला हवं.

ठाणे, कल्याण, भिवंडी पुरती निवडणूक मर्यादित नाही तर, जगात जिथे जिथे लोकशाही आहे त्या सगळ्या देशमध्ये लोकसभा निवडणुकीला महत्व आहे. सगळ्या जगाचे लक्ष या निवडणूकीकडे लागले आहे. देशाचे हित जपणाऱ्यांना, लोकशाही मानणाऱ्याना निवडून द्या असे आवाहन यावेळी पवार यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com