कंगनाचं ऑफिस उद्धवस्त करताना कोठे होती मर्दानगी? दरेकरांचं राऊतांना सणसणीत प्रत्युत्तर

तुषार सोनवणे
Tuesday, 24 November 2020

  • प्रताप सरनाईकांच्या घरी ईडी ने छापेमारी केल्यानंतर शिवसेनानेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती.
  • भाजपनेते प्रविण दरेकर यांनी त्याला उत्तर दिले आहे

मुंबई - शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालय आणि घरावर आज ईडीने छापा टाकला. त्यानंतर त्यांच्या मुलाला म्हणजेच विहंग सरनाईक याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात नेले. यावर शिवसेना नेते संजय राऊत तसेच सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी टीका केली आहे. भाजप खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यातच आता भाजपनेही या आरोपांना उत्तर दिले आहे. 

हेही वाचा - आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, हिंमत असेल तर घरी या: संजय राऊत

आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहेे. यावेळी त्यांचे पुत्र विहंग यांनाही ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. सरनाईक यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर आगपाखड करणे सुरू केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपवर टीका केली आहे. 'गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय या यंत्रणा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील तरी आम्ही पर्वा करत नाही. आज प्रताप सरनाईक त्यांच्या घरी नाही आहेत. त्यांची मुले घरी आहेत. हे पाहून त्यांनी जी धाड टाकली ही नामर्दांगी आहे. भाजपने सरळ लढाई करावी. हे शिखंडीसारखे यंत्रणांच्या आडून कारवाई करू नका. असे राऊत यांनी म्हटले आहे.

राऊतांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट केले की, प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली यात कसली मर्दानगी असे म्हणाणाऱ्या संजय राऊतांना विचारलं पाहिजे, एक महिला घरी नसताना. सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्धवस्त केलं,यात कोणती मर्दानगी होती?

हेही वाचा - प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक रवाना

प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणावर भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय टीकाटीप्पणी सुरू झाली आहे. याप्रकरणी आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demolished her office when she was not present Darekars scathing reply to Raut