मुंबईत डेंग्यू डासांचा उद्रेक थांबला; कोरोनाकाळात केलेल्या उपाययोजनांना यश

भाग्यश्री भुवड
Saturday, 5 December 2020

मुंबईत जून ते डिसेंबर या काळात डेंग्यूचे प्रमाण वाढलेले अनुभवायला मिळते. परंतु 2019 च्या तुलनेत यावर्षी डेंग्यूने ग्रस्त लोकांची संख्या 86 टक्के कमी झाली आहे

मुंबई : मुंबईत जून ते डिसेंबर या काळात डेंग्यूचे प्रमाण वाढलेले अनुभवायला मिळते. परंतु 2019 च्या तुलनेत यावर्षी डेंग्यूने ग्रस्त लोकांची संख्या 86 टक्के कमी झाली आहे. आकडेवारीनुसार, डेंग्यू डासांचा उद्रेक आता कमी झाला आहे. याचे सर्वात मोठे कारण पालिकेच्या किटकनाशक विभागाने कडक कारवाई केली आहे.

2020 हे आधीच कोरोनाच्या व्यापात गेले आहे. कोरोनामुळे इतर विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बराच काळ उपचारापासून वंचित राहावे लागले आहे. मात्र, डेंग्यू, मलेरिया या डासांचा नाश करणाऱ्या पालिकेच्या किटकनाशक विभागाने स्वच्छतेच्या कामात सक्रिय सहभाग घेतला आहे. अशा परिस्थितीत डासांचा उद्रेक वाढेल आणि रूग्णांमध्येही वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता, पण मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबईत डेंग्यूच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे.

हेही वाचा - कोरोना लस साठवणूकीसाठी मुंबई महापालिका सज्ज; महापौरांकडून कांजुरमार्गच्या जागेची पाहणी

2019 मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 881 लोकांना डेंग्यूची लागण झाली होती. तर यावर्षी केवळ 119 लोकांना या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे, रुग्णांच्या संख्येत 86.49 टक्क्यांनी घट झाली आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, किटकनाशक विभागाकडून डासांची पैदास होणारी ठिकाणे योग्य रित्या तपासणी केली गेली आहे.  दुसरे कारण असे आहे कि अनेक घरे बंद होती कारण कोरोनामुळे लोक आपल्या गावी गेले होते. डेंग्यूच्या डासांची पैदास होण्यासाठी स्वच्छ पाणी आवश्यक असते. घरे बंद होती आणि तेथे पाणी साचले नव्हते. त्यामुळे प्रकरणे फारच कमी आढळली. दरम्यान, मुंबईतील ई आणि जी दक्षिण प्रभागात डासांच्या पैदासची सर्वाधिक ठिकाणे आढळली आहेत. डेंग्यूमुळे काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि त्यांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dengue mosquitoes infection stopped in Mumbai