

CRZ approval Deonar
ESakal
देवनार कचरा डेपो परिसरातील रहिवाशांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. नुकत्याच मिळालेल्या किनारी नियमन क्षेत्र (सीआरझेड) मंजुरीमुळे देशातील सर्वात मोठ्या आणि ब्रिटीश काळापासून अस्तित्वात असलेल्या या कचरा डेपोच्या स्वच्छतेचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक दशकांपासून हा विस्तीर्ण कचरा डेपो वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना आणि गंभीर आरोग्य धोक्यांसाठी कुप्रसिद्ध राहिला आहे. दरवर्षी येथे लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे आकाशात विषारी धुराचे लोट पसरतात.