देवनार डंपिंग ग्राउंडवर लवकरच वीजनिर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

मुंबई - देवनार येथील डंपिंग ग्राउंडवर रोज तीन हजार टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिका 900 कोटींचा खर्च करणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी जगभरातून निविदा मागविण्यात आल्या आहेत. यातून दर वर्षी तीन कोटी तीन लाख युनिट वीजनिर्मिती होईल. हा प्रकल्प जुलै 2017 पूर्वी उभारण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. 

देवनार डंपिंगवर गेल्या वर्षी लागलेल्या आगीमुळे मुंबईतील प्रदूषण वाढले होते. त्यामुळे ते बंद करून तिथे कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचा अहवाल आणि टाटा कन्सल्टन्सीच्या मॉडेलनुसार पालिकेने या प्रकल्पासाठी निविदा मागवल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने हे डंपिंग ग्राउंड जुलै 2017 पासून बंद करण्याचा आदेश दिला आहे. तोपर्यंत हा प्रकल्प उभारायचा आहे. केंद्रीय पर्यावरण मंडळाच्या निकषांनुसार हा प्रकल्प असेल, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले. "बांधा, वापरा, हस्तांतरित करा' या तत्त्वावर हा प्रकल्प 15 वर्षांसाठी उभारण्यात येईल. सर्व प्रकारच्या परवानग्या मिळवण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असेल. शांघाय आणि टोकियोमध्ये तीन हजार टन कचऱ्यापासून वीज निर्माण करण्याचे प्रकल्प आहेत. तेवढ्याच क्षमतेचा हा प्रकल्प असेल. 

वीजनिर्मिती कमी झाल्यास दंड 

महापालिका 25 मेगावॉटचा प्रकल्प उभारणार आहे. ठरविल्यापेक्षा जास्त वीजनिर्मिती झाल्यास कंत्राटदाराला उत्पन्नाचा निम्मा वाटा मिळेल. कमी वीजनिर्मिती झाल्यास कंपनीकडून दंड वसूल केला जाईल.

Web Title: Deonar dumping ground early high power