esakal | कलाकारांच्या हाकेला सरकारची साथ, गायक संगीतकार डॉ.उत्कर्ष आनंद शिंदे यांच्या मागणीला यश
sakal

बोलून बातमी शोधा

कलाकारांच्या हाकेला सरकारची साथ, गायक संगीतकार डॉ.उत्कर्ष आनंद शिंदे यांच्या मागणीला यश

राज्यातील कलावंतांच्या या समस्या, व्यथा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांच्या सरकारदरबारी मांडल्या. मानधना अभावी वृद्ध कलावंतांना उदरनिर्वाह करणे जिकरीचे होत आहे.

कलाकारांच्या हाकेला सरकारची साथ, गायक संगीतकार डॉ.उत्कर्ष आनंद शिंदे यांच्या मागणीला यश

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असल्याने कलाकारांना जगणं मुश्किल झाले होते. राज्यातील वृध्द कलावंताची उपासमार सुरु झाली होती. नोंदणीकृत वृद्ध कलावंतांना राज्य सरकारच्या वतीने दरमहा देण्यात येणारी मानधनाची रक्कम कोरोना संकटामुळे बंद करण्यात आली होती. राज्यातील कलावंतांच्या या समस्या, व्यथा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांच्या सरकारदरबारी मांडल्या. मानधना अभावी वृद्ध कलावंतांना उदरनिर्वाह करणे जिकरीचे होत आहे.

या संदर्भात उत्कर्ष शिंदे यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन, या कलावतांचे गाऱ्हाने मांडले. कलावंत अंत्यत हलाखीत जगत आहे. त्याच्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने या कलावंताना त्वरीत थकीत मानधन द्यावे अशी मागणी केली. राज्य सरकारने या मागणीला प्रतिसाद देत, नोंदणीकृत वृद्ध कलावंतांच्या बँक खात्यात थकीत मानधनाची रक्कम खात्यात जमा केली.यामुळे  आर्थिक मदतीमुळे कलावंताना दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचाः  मनसेचे डोंबिवलीत आंदोलन, स्थानकाबाहेरचं पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं

वृद्ध कलावंत यांना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना अथवा आरोग्य योजनेत सहभागी करुन घेण्याची मागणी  उत्कर्ष शिंदे यांनी सरकारकडे केली होती. या राज्य सरकार सकारात्मक विचार करत असून, लवकरच वृद्ध कलावंतांना आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल असा विश्वास, डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Deposited amount credited account  old artist Success demand Utkarsh Anand Shinde