पेण अर्बन बॅंकेचे ठेवीदार म्हणून पुन्हा एकवटले; प्रशासनावर आराेप

पेण अर्बन बॅंकेचे ठेवीदार म्हणून पुन्हा एकवटले; प्रशासनावर आराेप
Updated on

खोपोली  : पेण अर्बन बॅंकेचे ठेवीदार आणि समिती सदस्यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला असून 7 सप्टेंबरला ते अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. 

पेण अर्बन बॅंक ठेवीदार आणि संघर्ष समितीची सभा खोपोली येथे नुकतीच झाली. या वेळी राज्य सरकार आणि प्रशासनाची ठेवीबाबत निष्क्रियता दिसत आहे, असा आरोप ठेवीदारांनी केला. बॅंक बुडवणाऱ्यांच्या बचावाचे काम सरकार करत असल्याबद्दल तीव्र संताप त्यांनी व्यक्त केला. सनदशीर मार्गाने ठेवीदारांना न्याय मिळावा, यासाठी मागील दहा वर्षे संघर्ष समिती पाठपुरावा करत आहे. मात्र सरकारे बदलली, अधिकारी बदलले; परंतु समस्या जैसे थे आहे. वर्तमान स्थितीत ठेवीदार प्रचंड आर्थिक अडचणीत असल्याने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आत्ता पुन्हा तीव्र आंदोलनाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार 7 सप्टेंबरला रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
आजपर्यंत सरकार व संबंधित अधिकाऱ्यांकडून ठेवीदारांची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट होत असल्याने याचा तीव्र निषेध ठेवीदार व संघर्ष समितीने या बैठकीत केला अआहे. 

हे वाचा : म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधींनी ठरवावे : राऊत

संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, सचिव चिंतामण पाटील, शिवसेना खोपोली शहरप्रमुख तथा गटनेते सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिरीष बिवरे यांनी ठेवीदारांना मार्गदर्शन केले. बैठकीला खोपोली, खालापूर आणि कर्जत भागातील ठेवीदार व संघर्ष समितीच्या सर्व शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पेण अर्बन बॅंकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळाव्यात, यासाठी आजपर्यंतच्या पाठपुराव्याबाबतची संबंधित सर्व माहिती खोपोलीतील बैठकीत ठेवीदारांना दिली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन संबंधित अधिकाऱ्यांकडून होत नाही. अधिकारी व प्रशासकीय व्यवस्थेकडून माननीय उच्च न्यायालयाचा वारंवार अवमान होत आहे. 
- नरेंद्र जाधव, कार्याध्यक्ष, पेण अर्बन बॅंक संघर्ष समिती 

.......

 

 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com