
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षसंघटन, उमेदवार चाचपणीच्या उद्देशाने शिंदे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. याच अनुषंगाने शनिवारी (ता. २७) कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईत येणार असून मेळाव्यानंतर निवडणुकीसाठीचे बिगुल शिंदे गटाकडून फुंकले जाणार असल्याची शक्यता आहे.