लोकलमधील गर्दीपाहून उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता, म्हणालेत "मोठी किंमत चुकवावी लागू शकते"

सुमित बागुल
Wednesday, 17 February 2021

कोरोनाचं संकट पुन्हा वाढतंय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढताना पाहायला मिळतायत. अशात सरकारकडून पुन्हा एकदा कठोर नियमांची अंमलबजावणी केली जाण्याचे संकेत दिले जातायत. मुंबईत नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत, सोशल डिस्टंसिंग आणि मास्क, सॅनिटायझर वापरलं नाही तर पुढं कठोर निर्णय घ्यावे लागतील असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. अशात मुंबईत लोकल सुरु झाल्यानंतर नागरिक देखील बेफिकीर झाल्याचं पाहायला मिळतायत. मुंबईतील लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहिलंय मिळतेय. अशात वाढत्या गर्दीचा मुंबईकरांना फटका बसू शकतो. याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. 

महत्त्वाची बातमी : विलगीकरणातून प्रवासी पळाले; महापौरांनी सुरु केलं स्टिंग ऑपरेशन

मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते : 

कोरोनाचं संकट पुन्हा वाढतंय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील आणि विशेषकडून मुंबईतील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. प्रशासनाने कितीही प्रयत्न केलेत तरीही नागरिकांनी त्यामध्ये प्रशासनाला साथ दिली पाहिजे. नुकतीच मुंबईची लोकल सुरु झालीये. मात्र लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. विविध माध्यमांनी देखील हे दाखवलं आहे. मुंबईतून कोरोना गायब झालाय असं नागरिक वागतायत. कोरोना पूर्व काळात जसे नागरिक वावरत होते, राहत होते तसेच आताही पाहायला मिळतायत. नागरिकांचं हे वागणं चुकीचं आहे. त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते. सर्वांनी स्वतःची आणि बाकीच्या सर्वांची काळजी घेतली पाहिजे आणि भारतातून महाराष्ट्रातून कोरोना कसा निघून जाईल याबाबत आपण विचार केला पाहिजे, असं अजित पवार म्हणालेत.   

deputy CM ajit pawar on mumbai local train and crowd in local train amid fear of corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deputy CM ajit pawar on mumbai local train and crowd in local train amid fear of corona