विलगीकरणातून प्रवासी पळाले; महापौरांनी सुरु केलं स्टिंग ऑपरेशन

समीर सुर्वे
Wednesday, 17 February 2021

महापौरांनी या प्रवाशांसह हॉटेलवरही गुन्हा दाखल करावा असे निर्देश दिले आहेत.

मुंबई, ता. 16: परदेशातून आल्यावर सात दिवस हॉटेलमध्ये विलगीकरणात राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, चार प्रवाशांनी विमानतळाजवळील हॉटेलमधून पळ काढल्याचा प्रकार उघड झाला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत: स्टिंग ऑपरेशन करुन हा प्रकार उघड केला असून या प्रकरणात चाैकशी करुन हॉटेलसह संबंधीत प्रवाशांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. हे प्रवासी ठाण्यातील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आखाती देशांसह काही देशातून येणाऱ्या प्रवाशांना खासगी हॉटेलमध्ये अथवा पालिकेच्या विलगीकरण केंद्रात विलगीकरणात राहाणे बंधनकारक आहे. अशा प्रवाशांसाठी विमानतळावरील साई इन या हॉटेलमध्ये सशुल्क सोय केली आहे. परदेशातून आलेले चार प्रवाशांनी या हॉटेलमध्ये चेक ईन केले. मात्र,सात दिवस हॉटेलमध्ये न राहता त्याचा दिवशी त्यांनी हॉटेलमधून पळ काढला. या प्रकारची कुणकुण महापौरांना लागल्यावर आत त्यांची या हॉटेलमध्ये जाऊन माहिती घेतली. तेव्हा या प्रकाराला दुजोरा मिळाला.

महत्त्वाची बातमी : अन्यथा पुन्हा इमारती सील केल्या जाणार, कोरोनाचा वाढता आलेख, महापालिका ऍक्शनमध्ये

महापौरांनी या प्रवाशांसह हॉटेलवरही गुन्हा दाखल करावा असे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या पथकाने या प्रवाशांना हॉटेलमध्ये सोडले. त्यानंतर त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी हाॅटेल व्यवस्थापनाची होती. मात्र, त्यांनी कुचराई केली. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. तसेच, पुन्हा अशा प्रकारचे धाडस कोणत्याही प्रवाशांचे होऊ नये म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करावा अशा सुचनाही महापौरांनी केल्या आहेत.

प्रवाशांंना शोधून काढा

पळून गेलेल्या प्रवाशांना जर कोविडची बाधा झाली असेल तर त्यांच्यापासून इतरांनाही बाधा होण्याची भिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे. त्यामुळे तत्काळ शोधून पुन्हा विलगीकरण करावे असेही निर्देशही महापौरांनी दिले आहेत.

महत्त्वाची बातमी : निर्देशांकांची सलग दुसरी घसरण; येत्या काळात पाहायला मिळणार मोठी घसरण?  

mumbai news tourist ran from isolation center mumbai mumbai mayor did sting operation

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news tourist ran from isolation center mumbai mayor did sting operation