esakal | आजोबांनी पार्थ पवारांना फटकारलं, काकांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

आजोबांनी पार्थ पवारांना फटकारलं, काकांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यावर काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र अजित पवारांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. 

आजोबांनी पार्थ पवारांना फटकारलं, काकांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारले.  पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी भाष्य करत माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात यावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. या प्रकारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यावर काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र अजित पवारांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. अजित पवारांनी मौन पाळणंचं पसंत केलं आहे.

आज सकाळी निवासस्थानाबाहेर पडल्यानंतर अजित पवार यांना पत्रकारांनी शरद पवार यांनी पार्थवर केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला. मात्र अजित पवार काहीच प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले. दरम्यान अजित पवार हे निवासस्थानावरून मंत्रालयाकडे गेले आहे. दुपारपर्यंत त्यांच्या मंत्रालयात विविध बैठका असून त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होतील, अशी माहिती समोर आली आहे.

शरद पवारांनी आपल्याच कुटुंबातील सदस्याला आणि त्यात आपल्या नातवाबद्दल सार्वजनिकरित्या सुनावल्यानंतर पवार कुटुंबात संघर्ष निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे. 

हेही वाचाः अजूनही संधी गेलेली नाही; आजही जाऊ शकता कोकणात, मात्र 'ही' आहे अट...

शरद पवार काय म्हणाले 

पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी CBI द्वारे करण्याची मागणी केली होती. पार्थ यांनी केलेल्या या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी म्हटलं की,  माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही. 

अधिक वाचाः जबरदस्त! धारावीत ऑगस्ट महिन्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

सुशांत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या ५० वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. सुशांतसिंग प्रकरणाची चर्चा करण्याचे कारण नाही. त्यामुळं कुणी काय आरोप केले यात मी खोलात जाणार नाही. माझ्या दृष्टीनं हा विषय तितका महत्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली तर नक्कीच दु:ख होते. मात्र त्याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे. त्याचे मला आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.

deputy cm ajit pawar no reaction ncp chief sharad pawar criticizes parth pawar

loading image
go to top