esakal | अजूनही संधी गेलेली नाही; आजही जाऊ शकता कोकणात, मात्र 'ही' आहे अट...
sakal

बोलून बातमी शोधा

अजूनही संधी गेलेली नाही; आजही जाऊ शकता कोकणात, मात्र 'ही' आहे अट...

आजपासून मुंबईतून कोकणात येण्यासाठी निघणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याला ४८ तास आधी कोरोना चाचणी करून घेण्याचे बंधनकारक असेल. तसंच जिल्ह्यात पोहचल्यानंतर ३ दिवस होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे.  

अजूनही संधी गेलेली नाही; आजही जाऊ शकता कोकणात, मात्र 'ही' आहे अट...

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून प्रवाशांसाठी काही खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानंतर कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी अखेर फुटली. या नियमात जे चाकरमानी कोकणात जातील, त्यांना १२ ऑगस्टपर्यंत अपेक्षित स्थळी पोहचायचं आणि त्यांच्यासाठी १० दिवसांचा होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. या अटीनंतर उशीर न करता हजारो चाकरमानी वेळेत एसटी बसनं किंवा खासगी वाहनाने आपल्या गावी दाखल झालेत. मात्र आजपासून मुंबई ठाण्यातून गावी जाण्यासाठी निघणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास खडतर असणार आहे. 

४ ऑगस्टला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केली. या नियमावलीनुसार आजपासून मुंबईतून कोकणात येण्यासाठी निघणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याला ४८ तास आधी कोरोना चाचणी करून घेण्याचे बंधनकारक असेल. तसंच जिल्ह्यात पोहचल्यानंतर ३ दिवस होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे.  

हेही वाचाः जबरदस्त! धारावीत ऑगस्ट महिन्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

आजपासून असतील हे नियम 

  • १३ ऑगस्ट म्हणजेत आजपासून आणि त्यानंतर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना ४८ तास अगोदर कोविड-१९ ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करून घ्यावी लागेल.
  • या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असला तरच कोकणात जाता येईल. जिल्ह्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तीला तीन दिवस होम क्वारंटाइन रहावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनानं तसंच यापूर्वीच जाहीर केलं आहे. 
  • एसटी बसनं कोकणात येण्यासाठी ई-पासची गरज लागणार नसून मात्र इतर खासगी गाड्यांनी येणाऱ्यांना ई-पास बंधनकारक असेल.
  • मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांवरून १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान एसटी बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

अधिक वाचाः पार्थ पवार यांना फटकारल्यानंतर काय होती राणे बंधुंची प्रतिक्रिया, जाणून घ्या

मोठ्या संख्येनं मुंबईतून कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांची संख्या पाहता एसटी गाड्यांची संख्याही मोठी असते. यंदाच्या वर्षी कोरोनाचं संकट लक्षात घेता परिवहन मंडळाकडून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी खास कोकणासाठी ३ हजार एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

From today going kokan for ganeshotsav covid test and 3 days quarantine mandatory

loading image
go to top