३१ मे नंतर काय ? अजित पवार मुख्यमंत्र्यांना भेटून करणार 'ही' मागणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात आहेत. त्यातच लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या चार दिवसात संपणार आहे.

मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात आहेत. त्यातच लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या चार दिवसात संपणार आहे. त्यामुळे या टप्प्यानंतर सरकार काय निर्णय घेणार किंवा राज्यात सरकारकडून काय उपाययोजन करण्यात येतील, याचा आढावा सध्या घेण्यात येत आहे. चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यात 5.0 जाहीर करणार या चर्चेनं जोर धरला आहे. त्यातच 31 मे नंतर रेड झोन असलेल्या भागात आणखी अटी शिथिल करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबद्दल सांगणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

31 मे रोजी राज्यातील चौथा लॉकडाऊन संपेल. या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनंतर रेड झोनमध्ये असलेल्या भागात औद्योगिक आणि सामान्य जनजीवन सुरु करण्याबाबत काही निर्णय घ्यावे लागणार असल्याची भूमिका अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

मोठी बातमी - 31 मे नंतर लॉकडाऊन 5.0, की उठणार राज्यातला लॉकडाऊन? वाचा पुढे काय... 

मुंबई- पुण्यात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त आहे. पहिल्या लॉकडाऊनपासून हे दोन्ही शहर रेड झोनमध्ये आहेत. त्यातच लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर मुंबई एमएमआरडीए परिसर, पुणे, पिंपरी- चिंचवड या भागातील अधिक अटी शिथिल कराव्या लागणार असल्याची स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. 

तसंच राज्यात गेल्या दोन महिन्यापेक्षाही जास्त दिवसापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे राज्यातील व्यवहार ठप्प झालेत. या लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकंही अडकलीत. या सर्वांचा विचार केल्यास जास्त काळ लोकांना लॉकडाऊनमध्ये अडकवून ठेवणं योग्य नसल्याचं म्हणत योग्य ती खबरदारी घेऊनच रेड झोन क्षेत्रात पुन्हा व्यवहार कार्यरत करावे लागतील, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. 

मोठी बातमी -  'अर्सेनिक अल्बम 30' गोळ्यांबाबत सरकारच 'संभ्रमावस्थेत', पण उत्साही कार्यकर्त्यांकडून गोळ्यांचे सर्रास वाटप

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार 

राज्यात असलेल्या रेड झोन भागात खबरदारी घेऊन अटी शिथिल करुन जास्त मुभा देणं गरजेचं आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली. 

शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातही लॉकडाऊन संदर्भात चर्चा झाली आहे. मुंबई पुण्यात कोरोनाचा प्रार्दुभाव सर्वाधिक आहे. त्यातच या भागातील आणि इतर शहरात कशापद्धतीनं लॉकडाऊन उठवता येईल यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. तसंच राज्याला कोरोनानं विळखा घातला असला तरी येत्या काळात जनजीवन रुळावर आणणं हाच पर्याय असल्याचंही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं. 

मोठी बातमी  - ताप' वाढला! कोरोनासह तापानं ४ जणांचा मृत्यू; घाटकोपरमध्ये भीतीचं वातावरण..

लॉकडाऊन आणखी वाढवणार? 

राज्यात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचा, छोट्या व्यापाऱ्यांचा तसेच नोकरदारांचा धीर सुटलेला पाहायला मिळाला. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा काही केल्या कमी होत नाही आहे.  दैनंदिन व्यवहार सुरु केले तर राज्यातल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस लॉकडाऊन कायम ठेवणं शक्य आहे का, असा विचार सध्या मुख्यमंत्री करत आहेत.

deputy cm ajit pawar will demand this this to chief minister uddhav thackeray about lockdown 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deputy cm ajit pawar will demand this this to chief minister uddhav thackeray about lockdown