विरार - वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे निलंबित उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध बेहिशेबी अपसंपत्ती प्रकरणी अखेर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी स्टे.डा.नं. ४२/२०२५ नोंद करून हा गुन्हा दाखल केला आहे..या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांच्या फिर्यादी वरून वाय. एस. रेड्डी विरोधात गुन्हा रजि. नं. ३३०/२०२५ प्रमाणे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (संशोधन २०१८) चे अधि. १९८८ चे कलम १३ (१)(ब) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..दरम्यान रेड्डी यांच्यावर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून ही गुन्ह्याची कारवाई करण्यात आली असून, तपासाअंती रेड्डी यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले होते. याअंतर्गत ED (अंमलबजावणी संचालनालय) ने यापूर्वी दि. १४ व १५ मे २०२५ रोजी रेड्डी यांच्या नालासोपारा व हैदराबाद येथील निवास स्थानी धाडी टाकल्या होत्या.यामध्ये नालासोपारा पूर्व येथील ७०१/ए, रश्मी रेसिडेन्सी, यशवंत विवा टाऊनशिप तसेच हैदराबाद (तेलंगणा) येथील ४६ व्हीला अपर्णा काऊंटी हाफिजेट, यां दोन्ही पत्त्यावरील निवासस्थानी ईडीने छापे टाकले होते..रेड्डीच्या घरात सापडलं डोळे दिपणारे घबाड१) २३ कोटी २५ लाख ५० हजार ९०० रुपये किंमतीचे सोन्याचे व हिरे-जडीत असे २६,३३८.०० ग्रॅम वजनाचे दागिने२) रू. ८ कोटी ३ लाख १२ हजार रुपये व पुन्हा३) रू. १९ लाख ९५ हजार अशी रोख रक्कम अशी एकूण मिळून ३१ कोटी ४८ लाख ५७ हजार ९०० रुपयांची अप संपदा हस्तगत केली होती..हा गुन्हा उशिराने दाखल करण्याचे कारण की, तक्रार दार यांनी या प्रकरणात लोकसेवक हे वसई विरार महानगरपालिकेत नगररचना विभागाचे उपसंचालक यां पदावर कार्यरत असल्याने त्यांना सर्व सोपस्कार पूर्ण करण्यास विलंब लागला.प्रत्यक्षात यां गुन्ह्याचा घटनाकाळ फिर्यादीने (सन २०१० ते दि. ३ जून २०२५ असा नमूद केला आहे.) तर तपासानुसार, रेड्डी यांनी वसई विरार महापालिकेत कार्यरत असताना आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात अप संपत्ती मिळवली होती. त्यांच्याकडे आढळलेली संपत्ती ही त्यांच्या अधिकृत ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अत्यंत जास्त असल्याने ही गुन्ह्यांची कारवाई करण्यात आली आहे..ही अप संपत्ती मिळवताना त्यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे घटनास्थळी भेट देणारे अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दत्ताराम करांडे तसेच दाखल अंमलदार पोउपनिरी रविंद्र परब तपास करत असून, या प्रकरणात तपासीक अधिकारी म्हणून स्वतः अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर हे कसून चौकशी करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.