गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीला वेग, निकृष्ट कामावर उपमहापौरांचा दणका; सॅम्पल तपासणीचे निर्देश, बिल न काढण्याची सूचना

Kalyan-Dombivli Road Potholes: कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील कामाचा दर्जा योग्य नसल्याची बाब उपमहापौर राहूल दामले यांनी उघडकीस आणली.
Deputy Mayor Rahul Damle On Roadwork

Deputy Mayor Rahul Damle On Roadwork

ESakal

Updated on

डोंबिवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जनाच्या काळात नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी शहरातील प्रमुख चौक तसेच वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम कंत्राटदारांमार्फत सुरू करण्यात येत आहे. मात्र, पावसाने उघडीप दिल्यानंतरही काही ठिकाणी कामाचा दर्जा योग्य नसल्याची बाब खुद्द उपमहापौर राहूल दामले यांनी उघडकीस आणली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com