

Deranged man pushed girl from running train
ESakal
पनवेल : लोकलमधील महिलांच्या डब्यात चढलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीला महिलांनी हटकल्याने त्या व्यक्तीने १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलले. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी पनवेल ते खांदेश्वर रेल्वेस्थानकांदरम्यान घडली. या घटनेत तरुणी जखमी झाली असून, या जीवघेण्या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली आहे. रेल्वे पोलिसांनी या घटनेतील व्यक्तीला खांदेश्वर रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या मदतीने अटक केली आहे.