बड्या इ कॉमर्स कंपन्यांना 'लव्हलोकल'ची टक्कर !

E commerce companies
E commerce companies sakal media

बड्या इ कॉमर्स कंपन्यांना देशी लव्हलोकलची टक्कर

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात (Lockdown tenure) देशी व्यापाऱ्यांना बड्या परदेशी इ कॉमर्स (Abroad E Commerce Company) कंपन्यांची भीती वाटत होती. मात्र ,आता लव्हलोकल या देशी इ कॉमर्स कंपनीने (lovelocal deshi E Commerce) या लॉकडाऊनमध्ये छोट्या दुकानदारांचा (Small Shopkeepers) माल घरपोच देण्यात मोठे साह्य केले आहे. (Desi love local E Commerce company competition to abroad companies)

यात मुंबईतील साडेसात हजार किराणा दुकानदार, औषधविक्रेते, फळ-भाजीपाला विक्रेते, बेकरी उत्पादक, मासेविक्रेते आदींचा समावेश आहे. मालाड, कांदिवली, डोंबिवली, कल्याण, विरार येथे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या लॉकडाऊनदरम्यान त्यांची ग्राहकसंख्या अर्ध्या लाखाने वाढली. मुंबईतच लव्हलोकल कडे स्थानिक विक्रेत्यांनी सेवेसाठी 40 हजार मागण्या नोंदवल्या. त्यांचा महसूलही दरमहा आठ लाख रुपयांपर्यंत वाढला. 35 शहरांमध्ये पन्नास हजार विक्रेते व अडीच लाख ग्राहक यांना सेवा दिली जाते. ग्राहकदेखील त्यांच्या अॅपवरून सामानाची मागणी नोंदवू शकतात.

E commerce companies
पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत वाढ , 3 हजार 106 कोटींची कमाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com