esakal | पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत वाढ , 3 हजार 106 कोटींची कमाई
sakal

बोलून बातमी शोधा

western railway

पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत वाढ , 3 हजार 106 कोटींची कमाई

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : कोरोना आणि लाॅकडाऊन काळात (Corona Lockdown) देशभरात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेद्वारे मालगाडी, (Railway transportation train) पार्सल गाडी चालविण्यात येत आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात धान्य, खते, सिमेंट, इंधन, दूध, मासे यांचा पुरवठा होतो. यातून 2021-22 या आर्थिक वर्षात (Annual Incone) पश्चिम रेल्वेला (Western Railway) 3 हजार 106 कोटी रूपयांची कमाई झाली आहे. यामध्ये देशभरात मालगाडीतून मालवाहतूक करून 2 हजार 527 कोटी, प्रवासी भाडे 378 कोटी, विविध प्रकारातून 201 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. मागील वर्षापेक्षा 63 टक्के अधिक उत्पन्न पश्चिम रेल्वेला मिळाले आहे. (Western Railway earns three thousand one hundred and six crore in corona lockdown tenure)

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम रेल्वेची मालवाहतूक सुरू आहे. प्रवासी सेवेसह मालगाडीचे वेळापत्रक तयार करून वेळेत आणि वेगात सामग्रीची वाहतूक केली जात आहे. पश्चिम रेल्वेने 1 एप्रिल 2021 ते 3 जुलै 2021 या कालावधीत 207 पार्सल ट्रेन चालविल्या आहेत. तर, याच कालावधीत मालगाडीद्वारे 20.95 मिलियन टनाची वाहतूक केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 15.80 मिलियन टन मालवाहतूक केली होती. पश्चिम रेल्वेने विविध पार्सल विशेष ट्रेनच्या माध्यमातून सुमारे 76 हजार टन मालाची वाहतूक केली.

हेही वाचा: आमदार प्रताप सरनाईक यांना मनी लाॅड्रिंग प्रकरणात तात्पुरता दिलासा

यामध्ये शेतीची सामग्री, औषधे, ऑपरेशन करण्याची साधने, मासे, दूध यांचा समावेश आहे. यातून सुमारे 25.72 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. पश्चिम रेल्वेद्वारे 47 मिल्क विशेष गाड्यांद्वारे 33 हजार टनाहून अधिक दूधाची वाहतूक केली. 57 कोव्हीड-19 विशेष पार्सल गाडी 9 हजार टन अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली. तर, 68 किसान रेल्वेद्वारे 16 हजार टन वजनी शेती उपयुक्त सामग्री, भाजीपाला, फुले, फळे याची वाहतूक करण्यात आली. कोरोनामुळे श्रमशक्ती कमी झाली आहे. तसेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर मात करून पश्चिम रेल्वेने 3 हजार 106 कोटी रुपये उत्पन्न मिळविले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

loading image