

Big Relief for Farmers as Maharashtra Clears Dam Silt Extraction Policy
sakal
मुंबई: राज्यातील धरणांमधील पाणीसाठा क्षमता वाढवण्यासाठी आणि वाळू उपशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाने उजनी, जायकवाडी यांसह सहा मोठ्या प्रकल्पांतून प्रायोगिक तत्त्वावर गाळ आणि गाळमिश्रित वाळू उपसा करण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेतून मिळणारा सुपीक गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार आहे.