अल्पवयीन मुलीशी चाळे करणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 February 2020

नवी मुंबई : अल्पवयीन मुलीसोबत अश्‍लील चाळे करून तिला व्हॉट्‌सऍपद्वारे अश्‍लील व घाणेरडे व्हिडीओ व मेसेजेस पाठवून तिचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुनील पिल्ले (58 रा. वाशी, सेक्‍टर- 7) असे या नराधमाचे नाव असून वाशी पोलिसांनी त्याला विनयभंगासह पोक्‍सो कलमाखाली अटक केली आहे. 

महत्‍वाचे...गडकिल्‍ल्‍यांवर दारू पिणार्‍यांवर कठोर कारवाई करा
 
या घटनेतील आरोपी सुनील पिल्ले हा टाटा पॉवर कंपनीत कामाला आहे; तर पीडित मुलगी त्याच भागात राहण्यास असून ती सध्या शिक्षण घेत आहे. सुनील पिल्ले व पीडीत मुलगी एकाच परिसरात राहण्यास असल्याने तिची त्याच्यासोबत चांगली ओळख होती. याचाच गैरफायदा उचलत आरोपी सुनील पिल्ले याने सदर मुलीसोबत जून-2017 पासून ते गत 25 ऑक्‍टोबर-2019 या कालावधीत वाशी सेक्‍टर-16 येथील एमटीएनएल ऑफिसच्या पार्किंग आवारात नेऊन त्या ठिकाणी तिच्यासोबत अत्यंत घाणेरडे व अश्‍लील चाळे केले. 

महत्‍वाचे...मलबार येथे इमारतीला भीषण आग

त्याचप्रमाणे या नराधमाने या मुलीला व्हॉट्‌सऍपद्वारे अश्‍लील व घाणेरडे व्हिडीओ व मेसेज पाठवून तिचा लैंगिक छळ केला. सदर मुलगी आरोपी सुनील पिल्ले याला घाबरत असल्याने या प्रकाराची माहिती तिने कुणालाही दिली नाही. त्याच्याकडून होणाऱ्या दैनंदिन लैंगिक छळात वाढ होऊ लागल्याने अखेर मुलीने गतआठवड्यात वाशी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुनील पिल्ले याच्यावर विनयभंगासह पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Detained for sexually assaulting a minor girl