esakal | मलबार हिल येथे इमारतीला भीषण आग
sakal

बोलून बातमी शोधा

मलबार हिल येथे सिलिंडर स्फोटामुळे इमारतीला भीषण आग लागली.

13 जणांची सुखरूप सुटका; अग्निशमन दलाचा जवान जखमी 

मलबार हिल येथे इमारतीला भीषण आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : मलबार हिल परिसरातील "लास्ट पाम' या 14 मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर बुधवारी रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट होउन भीषण आग लागली.

आग आणि धुराचे लोट पसरल्याचे समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाने रात्री उशिरापर्यंत 13 जणांची सुखरूप सुटका केली असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला; त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हेही वाचा ः मुंबईकर आता ऑफिसला लवकर पोहोचणार

मलबार हिल येथील हॅंगिग गार्डनजवळ "लास्ट पाम' इमारत आहे. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर बुधवारी रात्री 7 वाजून 55 मिनिटांनी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. इमारतीतीच्या पाचव्या मजल्यावरून आग पसरू लागल्याने आणि धुराचे लोट वाढू लागल्याने इतर मजल्यांवरील रहिवाशांमध्ये घबराट पसरली.

हेही वाचा ः मोठी बातमी - विनायक मेटे यांचा राजीनामा

जीव वाचवण्यासाठी नागरिक इमारतीबाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागहले; मात्र आग आणि धुरामुळे अनेक जण वरील मजल्यांवर अडकले. अग्निशमन दलातील जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. त्यांनी या इमारतीमध्ये अडकलेल्या 13 जणांची सुखरूप सुटका केली; त्यांच्यात तीन महिलांचा समावेश आहे.

बँकेला कसा गंडा घातला?  ः हायटेक चोरी : फास्टॅगद्वारे बँकेला २० कोटींचा गंडा

बचावकार्यदरम्यान अग्निशमन दलाचा एक जवान गुदमरला. त्याला तातडीने मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.