

Political Heat in Assembly as Rajesh More Highlights Infrastructure Gaps in 14 Merged Villages
Sakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : नवी मुंबई महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 14 गावांचा पायाभूत विकास अद्याप कागदोपत्रीच अडकलेला असून नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. रस्ते, विद्युत दिवे, भूयारी गटारे, शाळा, आरोग्य केंद्रे, तलाव, स्मशानभूमी यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचा या गावांमध्ये अभाव आहे. प्रशासनाकडून नियोजनाच्या आश्वासनांची मालिका सुरू असली, तरी प्रत्यक्ष कामांच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप वाढत असून तक्रारींना ऊत आला आहे.