...तरीही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री !

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

थोड्याच वेळात देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. दरम्यान नवीन मुख्यमंत्री आपला पदभार स्वीकारत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यानी देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून घोषित केलंय. 

दुपारी अजित पवार यांनी काही कारणांमुळे आपला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा आणखीन एक राजकीय भूकंप आला. यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी संख्याबळ नसल्याच कारण देत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केलाय. त्यामुळे जोवर आता महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री शपथ घेत नाहीत, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत.  

महाविकास आघाडीची संध्याकाळी हॉटेल ट्रायडेंट एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये तीनही पक्षांचे मुख्य नेते उपस्थित असणार आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचा नेता निवड केली जाणार असल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान अजित पवार या समारंभाला उपस्थित राहणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.  

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे शिवसेनेला सत्ता स्थापनेचं कधी निमंत्रण देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपच्या कालिदास कोळंबकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.   

Webtitle : devendra fadanavis is care taking chief minister of maharashtra

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadanavis is care taking chief minister of maharashtra