VIDEO :: ”बहती गंगा मैं हाथ धोना” हा प्रकार सध्या सुरु आहे : फडणवीस

सुमित बागुल
Monday, 7 December 2020

"जेव्हा शरद पवार केंद्र सरकार मध्ये होते तेव्हा त्यांनी टास्क फोर्सचे प्रमुख असताना याच सुधारणा केल्या होत्या, ज्या आम्ही केल्या आहेत." - देवेंद्र फडणवीस 

मुंबई : दिल्लीच्या वेशीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी येऊन थांबले आहेत. शेतकरी नेत्यांच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चांच्या फैरी झडतायत. अशात शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'भारत बंद' देखील पुकारला गेलाय. महाराष्ट्रातून देखील महाविकास आघाडीने म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगेसने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, तर 'भारत बंद'ला देखील पाठिंबा दिलाय. यावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि देशातील विरोधी पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा  आरोप फडणवीसांनी केला.

आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी २०१० च्या शरद पवारांच्या पत्राची देखील आठवण करून दिली. सोबतच ते म्हणालेत की, "जेव्हा शरद पवार केंद्र सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी टास्क फोर्सचे प्रमुख असताना याच सुधारणा केल्या होत्या, ज्या आम्ही केल्या आहेत". तर काँग्रेसच्या  जाहीरनाम्या बाबत देखील फडणवीसांनी वाच्यता केली, फडणवीस म्हणालेत की, काँग्रेसने म्हटलं होत की, बाजार समित्यांचा कायदा बरखास्त करू. जीवनावश्यक वस्तू कायदा बरखास्त करू." त्यामुळे आता 'बेहती गंगा मैं हाथ धोना' हा प्रकार सुरु असल्याचं फडणवीस म्हणालेत. 

महत्वाची बातमी शरद पवारांचं २०१० मधील APMC कायद्याला समर्थन देणारं पत्र आणि त्यावरील संजय राऊतांचं उत्तर
 

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे : 

 • कृषी विधेयकासंदर्भात दिल्लीत आंदोलन सुरू असून भारत बंदचा आवाहन करण्यात आल आहे.
 • विरोधीपक्षाची भूमिका किती दुटप्पी आहे, हे यामधून दिसून येत आहे.
 • UPA सरकार केंद्रात आणि राज्यात असताना APMC बाजारपेठ संदर्भात कायदा करण्यात आला आहे. कोणतीही APMC बंद करण्यात आली नाही. 
 • काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटलं होत की, बाजारसमित्यांचा कायदा बरखास्त करू. जीवनावश्यक वस्तू कायदा बरखास्त करू असं म्हटलं होतं.
 • राहूल गांधी यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगितल होतं APMC मधून फळभाज्या वगळल्या जातील.
 • जेव्हा शरद पवार केंद्र सरकार मध्ये होते तेव्हा त्यांनी टास्क फोर्सचे प्रमुख असताना याच सुधारणा केल्या होत्या, ज्या आम्ही केल्या आहेत.
 • ११ ॲागस्ट २०१० ला सर्व राज्यातील  मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं की APMC ची मक्तेदारी रद्द करा. 
 • शेतकऱ्याला आपला शेतमाल कोठेही विकता यावा त्यामुळे APMC ची मक्तेदारी रद्द करा.
 • कृषीउत्तपन्न बाजारसमितीची रचना आता कालबाह्य झाली, आहे शेतकऱ्यांना आपला माल परदेशातही विकता आला पाहीजे
 • शरद पवार यांनी कायद्याच्या मुलभूत तत्वाला कोठेही विरोध केला नाही
 • शरद पवार यांनी अन्न त्याग केला, मात्र मुलभूत तत्वाला विरोध दर्शवला नाही.
 • भारत बंद करण्याचा निर्णय हा अतिशय दुटप्पी असा निर्णय आहे.
 • १२ डिसेंबर २०१९ च्या स्थायी समित्यांच्या बैठकीत अशी भूमिका घेतली कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त केली पाहीजे. तेव्हा अकाली दल आमच्यासोबत सरकारमध्ये होतं. 
 • विनायक राऊत यांनी केंद्रात चर्चा करत असताना कृषी उत्तपन्न बाजार समितीची रचना बदलायला हवी असं म्हटलं आहे 
 • ”बहती गंगा मैं हाथ धोना” हा प्रकार येथे सुरू असल्याच पाहायला मिळतंय

मुंबईतील  सर्व महत्त्वाच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai

devendra fadanavis took press conference about farmers protest in india and stand of mahavikas aaghadi 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadanavis took press conference about farmers protest in india and stand of mahavikas aaghadi