esakal | शरद पवारांचं २०१० मधील APMC कायद्याला समर्थन देणारं पत्र आणि त्यावरील संजय राऊतांचं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवारांचं २०१० मधील APMC कायद्याला समर्थन देणारं पत्र आणि त्यावरील संजय राऊतांचं उत्तर

२०१० मध्ये शरद पवारांनी तत्कालीन दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना एक पत्र लिहिलं होतं.

शरद पवारांचं २०१० मधील APMC कायद्याला समर्थन देणारं पत्र आणि त्यावरील संजय राऊतांचं उत्तर

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनामुळे वातावरण प्रचंड संवेदनशील झालं आहे. अशात APMC कायद्याला समर्थन देणारं एक पत्र आता समोर येतं आहे. यामध्ये शरद पवार यांनी APMC कायद्याला पाठिंबा दिल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या पत्रावर शिवसेनेचे नेते, राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी ऊत्तर दिलं आहे. या पत्राबाबत बोलताना संजय राऊत म्हणालेत की,  "त्यावेळची आणि आताची परिस्थिती वेगवेगळी होती", स्वतः शरद पवार देखील हेच म्हणतील असं देखील संजय राऊत म्हणालेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. 

महत्त्वाची बातमी : ड्रग्स पेडलर्स रायगड पोलिसांच्या रडारवर, धागेदोरे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न

पत्रात नक्की काय आहे ?     

२०१० मध्ये शरद पवारांनी तत्कालीन दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी राज्यांमधील APMC कायद्यामध्ये काही बदल केले जावेत असं नमूद केलेलं. ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी, रोजगार आणि विकास करण्यासाठी कृषी क्षेत्राचे नियंत्रण करणाऱ्या बाजाराची गरज असल्याचं त्या पत्रात म्हंटल होतं. शेतकऱ्यांच्या मालाच्या साठवणुकीसाठी शीतगृहे तसेच इतरही बाबी गरजेच्या आहेत. ज्या खासगीकरणाच्या माध्यमातून उभारल्या जाऊ शकतात, असं त्यावेळी शरद पवारांचं मत होतं. 

आज शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा भारत बंदला पाठिंबा असल्याचं राऊत म्हणालेत. यावरून पत्रकारांनी संजय राऊत यांना शरद पवारांच्या २०१० मधील पत्राबाबत विचारणा केली, ज्यामध्ये शरद पवारांचा APMC कायद्याला पाठिंबा दिला होता. यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. 

मुंबईतील  सर्व महत्त्वाच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai

"शरद पवार हे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, ते स्वतः याबाबत खुलासा करतील. मात्र २०१० मधील परिस्थिती वेगेळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. शेतकरी  शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत असतो", असं संजय राऊत म्हणालेत.  

sharad pawars old letter supporting APMC bill back in 2010 sanjay rauts reply to letter