
"ओवेसीने ओरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवला, अन् तुम्ही...''; फडणवीसांची टीका
मुंबई : काल शिवसेनेच्या सभेनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी मुंबईत उत्तर सभा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray यांच्यावर हल्लाबोल केला, या सभेत बोलताना फडणवीस यांमा ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे जाहीर दर्शन घेतलं यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरलं.
ठाकरे सरकारच्या काळात फडणवीस म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांनी कधी विचार केला असेल का की त्यांच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीसा म्हणणं राजद्रोह होईल आणि ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजे यांचा छळ करून हत्या केली त्याच्या कबरीवर माथा टेकवणे हा राजशिष्टाचार होईल, असदुद्दील ओवेसीने ओरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवला आणि तुम्ही पाहत राहिलात, लाज बाळगा, घोटभर पाण्यात बुडून जीव द्या, असा टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला.
हेही वाचा: फडणवीसांच्या सभेला अवतरले मोदी; अस्सलिखित मराठीत दिली प्रतिक्रिया
पुढे फडणवीस म्हणाले की, ओवैसीनं ऐकावं औरंगजेबाच्या ओळखीवर कुत्रही फिरकणार नाही, आता भगवा फडकेल संपूर्ण हिंदुस्थानावर. शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्यांनी आपली तलवाऱ्या म्यान केल्या असतील पण आम्ही अद्याप म्यान केलेल्या नाहीत आम्ही थेटपणे मुकाबला करू ठोकून मुकाबला करु.
Web Title: Devendra Fadanvis Criticize Uddhav Thackerya Over Owaisi Visit To Aurangzeb Tomb
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..