फडणवीसांच्या सभेला अवतरले मोदी; अस्सलिखित मराठीत दिली प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi seen in devendra fadnavis uttar sabha in mumbai

फडणवीसांच्या सभेला अवतरले मोदी; अस्सलिखित मराठीत दिली प्रतिक्रिया

मुंबई : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhhav Tackeray) यांनी मुंबईत बीकेसीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत भाजपसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis), मनेसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला त्याला, दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या टीकेला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत. यासाठी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये भाजपच्या उत्तर सभेचे आयोजन करण्यात आले.

आजच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चक्क पंतप्रधान मोदी आल्याचं पाहायला मिळालं, या सभेसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये हुबेहुब नरेंद्र मोदी यांच्यासारखा दिसणारा एक कार्यकर्ता देखील उपस्थित होता. त्याने अस्सलिखित मराठीत माध्यमांशी संवाद साधला, मात्र ही व्यक्त खरेखुरे नरेंद्र मोदी नव्हते तर त्यांच्यासाऱखा दिसणारा व्यक्ती होता. ज्याच्यासोबत जमलेल्या लोकांनी सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.

दरम्यान या प्रतिकात्मक रूपात असलेल्या मोदींनी अस्सल मराठीत प्रतिक्रिया देत, भाजप-शिवसेना युती तुटली त्याबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, युती होती तेव्हा तुम्ही मला पाहीलं असेल, युतीचा कोणताही उमेदवार असो, त्यासाठी प्रचार मी केला, परंतु आज खेदाने सांगावं वाटतं, युती झाली नाही. त्याची कारण आपल्याला माहिती आहेत. याचं सर्वसामान्य माणसांना दुःख आहे,पण याचं सगळ्यात जास्त दुःख मला आहे, असे नरेंद्र मोदींचे प्रतिकात्मक रुप घेऊन फडणवीसांच्या सभेत आलेल्या कार्यकर्त्याने सांगितलं.

हेही वाचा: भारत श्रीलंकेला पुरवणार ४ लाख मेट्रिक टन इंधन

दरम्यान भाजपच्या या सभेत भाजप कार्यकर्त्यांना भगवी टोपी आणि पारंपरिक शेला देखील देण्यात आला. भगवी टोपी घालून सभेत जमलेल्या नागरिकांनी या सभेत हनुमान चालीसाचे जाहीर पठण देखील केले. काल झालेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेनंतर फडणवीसांनी ठोकके जवाब मिलेगा, असा इशारा उध्दव ठाकरे यांना दिला होता, त्यामुळे आजच्या या उत्तर सभेत काय उत्तर दिलं जातं, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: "कोणाच्या वडिलांच्या.."; केतकी चितळे प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Web Title: Narendra Modi Seen In Devendra Fadnavis Uttar Sabha In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top