निकाल लागताच फडणवीसांना मुंबई पोलिसांची नोटीस, घडामोडींना वेग

Devendra Fadnavis On Nawab Malik Resignation Uddhav Thackeray
Devendra Fadnavis On Nawab Malik Resignation Uddhav Thackeraye sakal

Devendra Fadnavis Press Conference : पाच राज्यांचे निकाल हाती आल्यानंतर देशात भाजपने सूत्र हालवण्यास सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर महाविकास आघाडीकडून यावर अद्याप ठोस स्पष्टीकरण आलेलं नाही. नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर भाजप ठाम असताना फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत असल्याचं सांगितलं. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. (Devendra Fadnavis Alleges MVA government )

गृह खात्यातील पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. यासंबंधी त्यांनी केंद्रात भेटीगाठी घेतल्या होत्या. याआधीच त्यांच्यावर पुणे पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, आता मुंबई पोलिसांनी यामध्ये उडी घेतली आहे. (Devendra Fadnavis)

Devendra Fadnavis On Nawab Malik Resignation Uddhav Thackeray
अर्थसंकल्पात आमच्याच योजनांचा पाढा ; फडणवीसांचा हल्लाबोल

विरोधी पक्षनेता असल्याने माझ्याकडे 'प्रीव्हिलेज' - फडणवीस

महाविकास आघाडी सरकारच्या होम डिपार्टमेंटचा घोटाळा मी बाहेर काढला होता. या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी आता सीबीआय करणार आहे, असे ते म्हणाले. यासंदर्भात कागदपत्र आणि पुरावे फडणवीसांनी केंद्रीय गृहखात्याच्या सचिवांना दिली होती. त्यानंतर ही कारवाई झाली आहे. (Police Transfer Corruption probe)

फडणवीसांनी तथाकथिक घोटाळा बाहेर काढल्यानंतर त्याच्याशी संबंधित फाईल्स आणि अन्य कागदपत्रे केंद्राच्या गृह सचिवांना दिले होते. यानंतर ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टमधील माहिती उघडकीस आल्याने राज्य पोलिसांनी फडणवीसांविरोधात तक्रार दाखल केली. यावर पुणे पोलिसांनी फडणवीसांना प्रश्नावली पाठवली होती. याची उत्तरे न दिल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितल. मात्र, ते खोटं असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.

मी काल मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी मला सीआरपीसी १६० ची नोटीस पाठवली आहे. यानुसार मला उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं आहे. मी पोलिसांना सहकार्य करणार असून बीकेसी पोलिसांच्या प्रश्नावलीला उत्तरं देणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

Devendra Fadnavis On Nawab Malik Resignation Uddhav Thackeray
आता लक्ष्य मुंबई! प्रदेश कार्यालयासमोरच फडणवीसांचा एल्गार

'मी पोलिसांना सहकार्य करणार'

मी जे बोलणार आहे त्याचा संदर्भ भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन गेल्या वर्षी मार्च महिन्यात गृहखात्यातील बदल्यांचा घोटाळा बाहेर काढला होता. त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत तसंच हे पुरावे देशाच्या गृहसचिवांना देतोय हेसुद्धा सांगितलं होतं. घोटाळ्याची जी माहिती माझ्याकडे होती ती त्याच दिवशी दिल्लीला गेल्यानंतर गृहसचिवांना दिली होती. त्याचं गांभीर्य ओळखून न्यायालयाने या संदर्भातील सगळी चौकशी ही सीबीआय़कडे सुपूर्द केली आहे.

या बदली घोटाळ्याची चौकशी सीबीआय करत असून अनिल देशमुखांची चौकशी केली जात आहे. ते सध्या तुरुंगात आहेत. यातल्या महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत. जेव्हा चौकशी सीबीआयकडे सोपवली तेव्हा राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्याकरता एक एफआयआर दाखल केला. तसंच ऑफिशियल सिक्रेटमधील माहिती लीक कशी झाली, अशी तक्रार दाखल केली. यासंदर्भात मला पोलिसांकडून प्रश्नावली पाठवण्यात आली होती, असं फडणवीस म्हणाले.

'अहवाल सहा महिने धूळ खात होता'

मी राज्याचा गृहमंत्री होतो, पोलिसांनी चुकीची केस केली असली तरी माझी मदत मागितली आहे ती करेन. माहिती बाहेर कशी आली याचा तपास करण्यापेक्षा सरकारकडे सहा महिने अहवाल पडला होता, कोण कुठे गेला ही माहिती असताना त्यावर कारवाई नाही. सरकारवर कारवाई व्हावी अशी मागणी आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com