Devendra Fadnavis : 'दिव्या'मधील बॅनर डोंबिवलीत झळकले! फडणवीसांचा फोटो गायब; चर्चांना उधाण

Banner in Dombiwali
Banner in Dombiwali

डोंबिवली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिव्यातील विकासकामांचा शुभारंभ तसेच भूमिपूजन सोहळ्यासाठी बुधवारी दिवा येथे येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. डोंबिवलीत झळकणाऱ्या एका बॅनरने मात्र साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.

Banner in Dombiwali
Crime News : हॉस्पीटलचा संपर्क क्रमांक ऑनलाईन शोधणे महागात! OTP देताच तीन दिवसांत अडीच लाख गायब

ठाण्याचे माजी उप महापौर शिंदे गटाचे पदाधिकारी रमाकांत मढवी यांनी स्वागतासाठी लावलेला हा बॅनर असून त्यावर शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो आहेत. दिव्यातील पदाधिकाऱ्यांचे बॅनर डोंबिवलीत झळकत असल्याने तो चर्चेचा विषय असताना भाजपा शिंदे गटाचे येथे ही सूत जुळत नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.

दिव्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघात हा कार्यक्रम होत असल्याने शिवसेना पदाधिकारी कंबर कसून कामाला लागले आहेत.

त्यातच डोंबिवली मध्ये स्टेशन व इतर परिसरात झळकणारा बॅनर मात्र साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. माजी उप महापौर रमाकांत मढवी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी लावलेले हे बॅनर आहेत. या बॅनर वर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. शिंदे व स्वतः मढवी यांचे फोटो असून इतर कोणाचे ही फोटो झळकवण्यात आलेले नाही.

भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही या बॅनर वर स्थान देण्यात आलेले नाही. तसेच कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांचाही फोटो नाही. दिव्यातील बॅनर डोंबिवलीत झळकल्याने आधीच चर्चा होत असताना त्यावर असणाऱ्या फोटोनी वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

Banner in Dombiwali
Jitendra Awhad: मन सुन्न झालंय...! राज्यात आणखी एक दलित हत्याकांड; आव्हाडांच्या ट्विटनं वेधलं लक्ष

ठाणे महापालिकेत शिवसेना भाजपा युतीची सत्ता होती. मात्र याच महापालिकेचा भाग असलेल्या दिवा शहरातील भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते कधीच एकत्र आले नाही. ते कायम एकमेकांच्या विरोधात बोलत आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात अनधिकृत बांधकामाचे प्रदर्शन भाजपाचे रमाकांत मढवी हे भरवणार आहेत. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती समजले जाणारे भाजपाचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण व शिवसेना यांच्यात दरी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

चव्हाण यांची आधीच ठाणे येथून कोंडी होत असताना कल्याण लोकसभेची जागा लढवण्याची तयारी भाजपा कडून केली जात असल्याने या नाराजीत आणखी वाढ झाल्याचे बोलले जात आहे. कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेना भाजपाची युती आतापर्यंत अभेद्य असताना दिवा नंतर येथे ही आता दोघांत बिनसु लागल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com