

Devendra Fadnavis says on Thackeray Brothers
ESakal
मुंबई : आतापर्यंत भाजपच्या विजयाविरोधात ईव्हीएमच्या नावाने ओरडणारे विरोधक, आता बिनविरोध विजयावरून आरडाओरड करीत आहेत. महापालिका निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काहीतरी सबब सांगण्यासाठी ते कथा रचत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कांदिवलीत झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. महायुतीच्या भीतीमुळे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. हा प्रीतीसंगम नसून भीतीसंगम आहे, अशी खिल्लीही मुख्यमंत्र्यांनी उडवली.