'सत्ता विसर्जनाचा मुहूर्त त्यांनाच विचारून काढतो'; देवेंद्र फडणवीसांचा स्वकीयांनाच टोला

तुषार सोनवणे
Tuesday, 1 September 2020

भाजपच्या ठराविक नेत्यांकडून व्यक्त होणाऱ्या भाकीतांवर खुद्द फडणवीस यांनी कान उपटले आहेत.

मुंबई - राज्यात मोठ्या राजकीय घडामो़डींनंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. परंतु राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्ता मिळवता आली नाही. त्यानंतर भाजपच्या अनेक जेष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीवर कठोर टीका केल्या. अनेक जणांनी महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस टिकनार नाही असे कयास लावले आहेत. हे सरकार लवकरच विसर्जित होणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असं भाकीत सातत्याने भाजपच्या ठराविक नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या नेत्यांचे खुद्द फडणवीस यांनीच कान उपटले आहेत.

पूरामुळे जेईई परीक्षा देऊ न शकलेल्या त्या विद्यार्थ्यांसाठी मंत्री उदय सामंत सरसावले; म्हटले की 'काळजी करू नका..

महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कलह असून, या कलहांमुळेच ठाकरे सरकार पडेल, सरकार लवकर विसर्जित होईल असे नारायण राणे, रामदास आठवले, खासदार गोपाळ शेट्टी अशा नेत्यांनी अनेकवेळा बोलून दाखवले आहे. या नेत्यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचले आहे. 'सत्ता विसर्जनाचा मुहूर्त नेमका कधी काढायचा हे असे वक्तव्य करणाऱ्यांशी चर्चा करूनच ठरवणार असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

दहा दिवसानंतर मुंबईत विघ्नहर्त्याला भक्तीभावाने निरोप 

देवेंद्र फडणवीस हे दहिसरमधील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्य महोत्सवात उपस्थित होते. त्यावेळी राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. राज्यातील सरकार पाडण्याचे मुद्दे गौण असून आमच्यासाठी कोरोनाची लढाई महत्वाची आहे असेही फडणवीस यांनी यावेळी म्हटले. या महोत्सवात बोलताना राज्यातील आवाजावी वीजबिलांच्या वाढीच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रीया दिली

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis criticizes his own leaders