''ठाकरे सरकारला शरम वाटायला हवी!''; शरजिल उस्मानी प्रकरणावर फडणवीसांचा संताप

''ठाकरे सरकारला शरम वाटायला हवी!''; शरजिल उस्मानी प्रकरणावर फडणवीसांचा संताप

मुंबई - शरजील उस्मानी नामक व्यक्तीने पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेत समस्त हिंदू समाजाबद्दल केलेले अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्य आणि त्याच्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. दरम्यान या प्रकरणी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी एल्गार परिषद आणि ठाकरे सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे.

''शरजिल उस्मानी नावाचा कोणीतरी सडक्या डोक्याचा इसम पुण्यात येतो. पुण्यातल्या एल्गार परिषदेत हिंदूंना सडक्या म्हणतो. हिंदू काय रस्त्यावर पडलेत? या राज्यात मोगलाई आहे का? शरम वाटायला हवी या सरकारला शरम!'', अशी झणझणीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.  

'' या महाराष्ट्रामध्ये कोणीही येऊन हिंदूंना सडक्या म्हणणार असेल आणि जर महाराष्ट्रातील सरकार ऐकून घेणार असेल, तर भारतीय जनता पक्ष शांत बसणार नाही. तत्काळ त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी. अन्यथा भाजप तीव्र आंदोलन छेडेल. एल्गार परिषद समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आयोजित केली जात असते. हा अनुभव असतानाही सरकार या परिषदेला परवानगी का देतं?  सरकारने कारवाई न केल्यास हिंदूच्या विरोधात बोलणाऱ्यांशी सरकारची मिलीभगत आहे. असंच आम्हाला वाटेल. त्याविरोधात कठोरातील कठोर कारवाई करायला हवी''. असंही त्यांनी यावेळी म्हटले.

एल्गार परिषदेत शरजिलने केलेल्या व्यक्तव्याबाबत समाजमाध्यमांवरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आज फडणवीस यांनी त्याच्यावर सरकारने तत्काळ कारवाई करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार याबाबत काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

-----------------------------------------------------

Devendra Fadnavis criticizes Thackeray government in Sharjeel Usmani elgar parishad case

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com