'राजा उदार झाला अन् हाती दिला भोपळा'; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

'राजा उदार झाला अन् हाती दिला भोपळा'; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून कोरोना आणि नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. संपूर्ण राज्यात वादळामुळे मोठे नुकसान झाले होते. राज्यातील शेतपिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौरा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर येथे दौऱ्यावर असताना, नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलेल्या धनादेशावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस राज्यविधिमंडळाच्या अधिवेशनात बोलत होते. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा सोलापूर पहाणी दौऱ्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या हस्ते तीन हजार रुपयांच्या चेकचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती जेव्हा अशा ठिकाणी जाते तेव्हा त्यांच्या हस्ते किती मदत द्यावी याचा काहीतरी राजशिष्टाचार ठरवण्यात आला पाहिजे. कारण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अवघ्या तीन-तीन हजारांचे चेक नुकसान भरपाई म्हणून देणं योग्य नाही. अजितदादा, मुख्यमंत्र्यांच्या हाताने केवळ तीन हजारांचे चेक वाटप केलं जाणं बरोबर आहे का? अशा प्रकारची मदत देणं म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ याच म्हणीप्रमाणे आहे”, अशी झणझणीत टीका फडणवीसांनी यावेळी केली.

महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने केवळ तीन हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करणं हा पदाचा अपमान आहे. मला उद्धव ठाकरेंना विचारावंसं वाटतं की या अपमानाने तुम्ही का व्यतित झाला नाहीत? हा केवळ मुख्यमंत्र्यांचाच नव्हे तर शेतकऱ्यांचाही अपमान आहे. ज्या शेतकऱ्यांनी वादळात आपलं घर गमावलं, अशा शेतकऱ्याला कुठल्यातरी योजनेतील अवघे तीन हजार रूपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चेकमार्फत दिले जातात ही शरमेची बाब आहे. किमान आपल्या मुख्यमंत्र्यांची इभ्रत टिकवण्यासाठी तरी अशा लोकांवर कारवाई करा”, असेही त्यांनी विधिमंडळात म्हटले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com