फडणवीस म्हणतात, मला कोरोनाची लागण झाल्यास 'या' रुग्णालयात दाखल करा

फडणवीस म्हणतात, मला कोरोनाची लागण झाल्यास 'या' रुग्णालयात दाखल करा

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. अशातच कोरोनाचा व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य पातळीवर विविध प्रयत्न केले जाताहेत. या व्हायरसमधून कोणाचीही सुटका झालेली नाही. बड्या बड्या नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचं वृत्त आपण पाहिलं आहे. या सगळ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय. या ऑडिओ क्लिपमध्ये फडणवीस गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा करताहेत. 

जर मला कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रुग्णालयात भरती करा, असं देवेंद्र फडणवीस गिरीश महाजनांना सांगत असल्याचं ऐकू येतंय. एका वृत्तवाहिनीनं यासंदर्भातलं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

या ऑडिओ क्लिपमध्ये फडणवीस महाजनांना काय सांगतायेत

कोरोनाची लागण झाल्यास मला सरकारी रुग्णालयातच दाखल करा. खासगी रुग्णालयात सध्या भरमसाठ बिलं आकारताहेत. सर्वसामान्य नागरिक सरकारी रुग्णालयात भरती होते, त्यामुळे मलाही मुंबईतल्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात भरती करा. अन्यथा जनतेचा आपल्यावर विश्वास राहणार नाही. या यंत्रणेवर लोकांचा विश्वास वाढायला हवा यासाठी त्यांनी गिरीष महाजनांकडे फडणवीसांनी अशी मागणी केली आहे. 

फडणवीसांच्या मागणीवर महाजन म्हणालेत की, गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना संदर्भात आम्ही राज्यभरात दौरा करत आहोत. यामध्ये अनेक रुग्णालयात सर्वसामान्य जनतेला नीट उपचार मिळत नसल्याचं वास्तव समोर आलं होतं. अशावेळी मोठे  पुढारी खासगी रुग्णालयात भरती होताहेत. त्यावेळी फडणवीस मला म्हणाले की मला काही झालं तर मला सरकारी रुग्णालयातच दाखल करा.

ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांना कोरोनाची लागण

सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात आतापर्यंत महाविकास आघाडीतील तीन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या तिघांनीही कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

devendra fadnavis girish mahajan audio cilp viral about corona virus

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com