"PM मोदी ओबीसी नाहीत", पटोलेंच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Patole_Modi_Fadnvis

"PM मोदी ओबीसी नाहीत", पटोलेंच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार; म्हणाले...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर आता उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर सडकून टीकाही केली. (Devendra Fadnavis hits back at Nana Patole claim that PM Modi is not an OBC)

हेही वाचा: दसरा मेळाव्यावरुन BMCवर वाढला दबाव! शिवसेनेनं थेट लेखीच मागितलं उत्तर

नाना पटोले हे दिवसभर काहीबाही बोलत असतात त्यांच्या बोलण्याला गांभीर्यानं घ्यायचं नसतं, अशा शब्दांत फडणवीसांनी पटोलेंना उत्तर दिलं आहे. "मोदी हे ओबीसी नाहीत, गुजरातमधून आम्ही त्यांची संपूर्ण माहिती काढली आहे. मोदी ही जात असून ती व्यावसायिक अर्थात सवर्ण जातींमध्ये मोडते. पण भाजप ते ओबीसी समाजाचे असल्याचं खोटं सांगत ओबीसींची मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच आम्ही जनतेसमोर आमची भूमिका मांडणार आहोत" असा दावा नाना पटोले यांनी केला होता.

आदित्य ठाकरेंवर केली टीका

आदित्य ठाकरे पाकिस्तानात जाण्याची भाषा करतात याचं मला आश्चर्य वाटतं. मागे कंगना राणावत असंच काहीतरी बोलल्या होत्या तर त्यांनी केवढा मोठा गहजब केला होता. पण आता आदित्य ठाकरे पण तेच बोलणार असतील तर मला आश्चर्य वाटतंय, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली.

Web Title: Devendra Fadnavis Hits Back At Nana Patole Claim That Pm Modi Is Not An Obc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..