esakal | बोलल्याप्रमाणे फडणवीस कोरोनाच्या उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

बोलल्याप्रमाणे फडणवीस कोरोनाच्या उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली.फडणवीस यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बोलल्याप्रमाणे फडणवीस कोरोनाच्या उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली. गेले काही दिवस देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते. ते सतत गर्दी आणि लोकांमध्ये फिरत होते. गेल्या काही दिवसांमध्ये फडणवीसांनी तब्बल ९०० किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास केला आहे. फडणवीस हे पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल झालेत. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली.

लॉकडाऊनच्या काळात राज्यात फिरत असताना फडणवीस यांनी सरकारी रुग्णालयांची अवस्था पाहून अस्वस्थ झाले होते. त्यानंतर सरकारी रुग्णालयातील रुग्णांचे हाल पाहून त्यांनी सरकारवर टीकाही केली होती. तसंच त्यावेळी त्यांनी आपले मित्र गिरीश महाजन यांच्याकडे एक इच्छाही व्यक्त केली होती. 

अधिक वाचा-  दसऱ्यानंतर KEMमध्ये स्वयंसेवकांना कोव्हिशील्डचा दुसरा डोस, उद्यापासून डोस देणार 

त्यांनी गिरीश महाजन यांनी फोन करुन मला कोरोनाची संसर्ग झाला तर मुंबईतल्या सरकारी रुग्णालयात भरती करा, कोणत्याही खासगी रुग्णालयात दाखल करुन नका अशी सूचना केली होती. त्यानुसार फडणवीस यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

देवेंद्र फडणवीस हे सध्या मुंबईत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते पुढील औषधोपचार घेत आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलंय.

अधिक वाचा-  चला आजपासून व्यायामाला करा सुरुवात; जिम, व्यायामशाळा सुरु

पुढे देवेंद्र फडणवीस यांचा बिहार दौरा नियोजित होता. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस तिथं जाणार होते. 

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी, असं म्हणत त्यांनी आपल्या झालेल्या कोरोनाबद्दल माहिती दिली आहे.

Devendra Fadnavis infected with corona Admitted government hospital treatment

loading image