देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट
राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट

मुंबई: महाराष्ट्रात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी आज दुपारी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ही भेट सदिच्छा असली, तरी राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. (Devendra fadnavis meet ncp chief sharad pawar)

अलीकडेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रकृतीची विचारपूस करण्याबरोबरच अन्य विषयांवर सुद्धा चर्चा झाल्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला मराठा आरक्षण, ओबीसींच राजकीय आरक्षण हे राज्यातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. यावर राजकीय एकमत घडून येणं, आवश्यक आहे. या संदर्भातही दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये काही मतभेद आहेत. त्या पार्श्वभूमीवरही शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे. पण तूर्तास असा कुठलाही राजकीय सत्ताबदल होणार नाही, असे राजकीय पंडितांचे म्हणणे आहे. काही वेळेपूर्वी मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. राजकारण बाजूला सारून कोणासोबतही चर्चा करायला तयार आहे असाही ते म्हणाले होते.

टॅग्स :Devendra Fadnavis