देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार : अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्याप्रकरणी अमित शहा यांचे मुंबईत व्याख्यान आहे. गोरेगावमधील नेस्लो संकुलात झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते.

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (रविवार) मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देताना सध्याचे मुख्यमंत्री आणि निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री अशी ओळख करून दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास फडणवीसच मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्याप्रकरणी अमित शहा यांचे मुंबईत व्याख्यान आहे. गोरेगावमधील नेस्लो संकुलात झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते.

अमित शहा यांनी भारत माता की जयच्या घोषणेने भाषणाची सुरवात केली. काहीही झाले तरी भाजपचा विजय निश्चित आहे, असे सांगत शहा म्हणाले, की मुख्यमंत्री फडणवीस होणार हे नक्की आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis once again CM in Maharashtra says Amit Shah