Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

भिवंडी लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार खासदार कपील पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते.
devendra fadnavis over india political alliance lok sabha politics
devendra fadnavis over india political alliance lok sabha politicsSakal

Thane News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे इंजिन देशाला प्रगतीकडे नेणारे आहे. या इंजिनाला भिवंडीतून साथ द्यावी. तर २६ पक्षांची खिचडी असलेल्या पक्षांकडून प्रत्येक जण मीच इंजिन असल्याचे सांगत असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीला लगावला.

भिवंडी लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार खासदार कपील पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते. या मिरवणुकीदरम्यान त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना इंडीया आघाडीवर टिका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ कोटी गरीबांची प्रगती केली असल्याचे सांगत, ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांच्यासारख्या देशभक्ताला उमेदवारी दिली. मात्र, कॉंग्रेसकडून उज्वल निकमांनी देशद्रोही अजमल कसाबची बदनामी केली, असा आरोप केला जात असल्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.

तसेच भिवंडी मेट्रो प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच भिवंडी शहराला मेट्रो कनेक्टिव्हीटी मिळेल. त्यातून भिवंडीकरांचा प्रवास सुकर होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कपिल पाटील यांना मतदान करून लोकसभेत पाठवावे, असे देखील आवाहन फडणवीस यांनी केले. राहुल यांच्या इंजिनमध्ये केवळ सोनिया आणि प्रियंका यांना, उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य यांना तर, शरद पवार यांच्या इंजिनमध्ये सुप्रिया यांनाच जागा आहे.

तिथे इतर कुणालाच जागा नाही, अशी टिकाही त्यांनी केली. तसेच आपल्याकडे आता खरे इंजिन असलेली मनसेही जोडली गेली असून यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले. पाकीस्तानचा मंत्री फवाज चौधरी यांनी टिव्ट केले आहे की, भारतात राहुल गांधी आणि इंडीया आघाडीचा बोलबाला आहे.

पाकीस्तानात राहून त्याला कळते की, भारतात राहुल गांधीचा बोलबाला आहे. कारण त्यांना माहित आहे की आधीच आपल्याकडे भीकेचा कटोरा आहे आणि त्यात मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर आपली काय अवस्था होईल. त्यामुळे देशात मत मिळत नसल्यामुळे इंडीया आघाडी आता मत मागण्यासाठी पाकीस्तानमध्ये जात आहे, अशी टिका फडणवीस यांनी यावेळी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com