
मुंबई : महाराष्ट्रात विकसित पोलाद निर्मितीची मजबूत परिसंस्था पाहता सध्या चौथ्या क्रमांकावर असलेले राज्य पुढील आठ वर्षांत पोलाद निर्मितीत देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील या प्रस्तावित प्रकल्पांतून ९० हजार ३०० लोकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असेही त्यांनी म्हटले.